मेडिलिक्स हॉस्पिटल तर्फे महिला मोफत आरोग्य तपासणी
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी शहरातील मेडिमिक्स हॉस्पिटल यांचे विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून मंगळवारी तालुक्यातील महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
महिलावर घरच्या व कार्यालयीन अशा दुहेरी कामांचा भार असल्याने धावपळ, दगदग, ताणतणाव इत्यादीमुळे सातत्याने आरोग्यविषयक तक्रारी निर्माण होत असतात. मात्र अनेकदा वैद्यकीय तपासणी करण्यास चालढकल होत असल्याने रोगाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. नेमके, या उद्देशाने शहरातील मेडिलीक्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. स्वागत ससाणे यांचे तर्फे महिला मोफत आरोग्य तपासणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आरोग्य तपासणीमध्ये हिमोग्लोबिन, रक्तदाब, रक्तगट, रक्तसाखर, महिला आरोग्य विषयक शंकानिरसन व औषध उपचार याबाबत सदर शिबिरात तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले.
तालुक्यातील सुमारे ६५ महिलांनी उत्स्फूर्तपणे या शिबिरात सहभाग घेतला होता. डॉ. स्वागत ससाणे यांनी महिलांची आरोग्य तपासणी केली.
सदर शिबिराच्या यशस्वितेसाठी डॉ. सागर सारूक, अशोक गोर्डे, राजू जाधव, अर्चना जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.