जिनिंग मिलला आग; ३ कोटींचे नुकसान
शेवगाव- प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील शॉटसर्किटने लागलेल्या आगीत अमरापूर येथील वाय. के.कॉटन अॅण्ड जिनिंग मिल मधील कपाशीच्या गाठी व मशनिरी जळून सुमारे तीन कोटीचे नुकसान झाले. ही घटना आज (सोमवार) पहाटे घडली.
आगीत ७० ते ८० लाखांचे बेलप्रेसिंग मशीन, २ कोटीच्या ९०० ते १ हजार कपाशीच्या गाठी असे सुमारे तीन कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
अमरापूर येथे नगर लगत असणाऱ्या वाय.के.कॉटन अॅण्ड जिनिंग मिलला सोमवारी पहाटे साडेचार वाजता शॉटसर्किटने आग लागली.
ही आग मिलच्या शेजारी राहणाऱ्या गोरक्ष बोरुडे यांच्या लक्षात आल्याने त्यांणी तातडीने जिनिंग मालक प्रविण शिंदे व भेंडा येथील नामदेव निकम यांच्याशी संपर्क साधला.
सदर मालक घटनास्थळी येईपर्यंत तेथील कामगारांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. पंरतु वारे असल्याने ही आग अधिकच भडकली.
या दरम्यान अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. यानंतर पाथर्डी तालुक्यातील वृध्देश्वर व नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर कारखान्याचे अग्निशामन दलाचे पंप घटनास्थळी दाखल झाले.
या अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.