महाराष्ट्र
श्री तिलोक जैन विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात
By Admin
श्री तिलोक जैन विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी शहरातील श्री तिलोक जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात १९९४ सालच्या विज्ञान शाखेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शाळेच्या प्रांगणात अतिशय उत्साहात व आनंदात पार पडला.
१९९४ मध्ये बारावीत असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनी २८ वर्षांनंतर एकमेकांना भेटली. या भेटीच्या आनंदासोबत आठवणींच्या दुनियेत रममान होतांना डोळ्यातून डोकावणारे अश्रूही अनेकांना थोपविता आले नाहीत. एकमेकांशी हितगुज करतांना शालेय जीवनातील आठवणींची पाने परस्परांच्या साथीने उलगडू लागली. तसतसे भूतकाळात शिरतांना आणि वर्तमानाची त्याच्याशी सांगड घालतांना सर्वांनाच अनोख्या दुनियेची सफर घडली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तिलोक ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव सतीश गुगळे तर प्रमुख पाहुणे म्हणून विश्वस्त सुरेश कुचेरीया, डॉ. ललीत गुगळे, धरमचंद गुगळे, राजेंद्र मुथ्था, डॉ. सचिन गांधी, डॉ.दीपक छाजेड, डॉ. अभय भंडारी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना सतिश गुगळे म्हणाले की, माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन हे शाळेच्या दृष्टिकोनातून शाळेच्या प्रगतीचे उदाहरण असते. तसेच सामाजिक कार्यात शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे योगदान अतिशय मोलाचे असते. शाळेच्या प्रगतीमध्ये माजी विद्यार्थी हे प्रेरणास्थान असतात.
संस्थेस विश्वस्त व प्रसिद्ध बाल रोग तज्ञ डॉ. गुगळे म्हणाले की, मित्रत्वाचे नाते जपणे हे आरोग्यासाठीही महत्त्वाचे आहे आणि आपले मित्र हीच खरी संपत्ती आहे. मित्रांमुळे व्यक्तीचे मानसिक व शारीरिक आरोग्य चांगले राहते, असे सांगत यावेळी त्यांनी मैत्रीचे सकारात्मक पैलू असलेले अनेक उदाहरणे दिली.
या स्नेहमेळाव्यासाठी माजी विद्यार्थ्यांच्या विनंतीला मान देत सेवानिवृत्त शिक्षक प्रा. रमेश बाहेती, अरविंद कस्तुरे, कचरदास सुराणा, बादशहा शेख, विठ्ठल बडे, रावसाहेब मोरे, मुख्याध्यापक अशोक दौंड आदी उपस्थित होते. या सर्व निवृत्त शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या वतीने हृदयस्थ सन्मान करण्यात आला. याप्रसंगी लष्करातून सेवानिवृत्त झालेले दत्तात्रय दिंडे व कवियत्री विद्या भडके यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
माजी विद्यार्थ्यांच्या वतीने विद्या आंधळे हीने शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत गुरुजनांचा आपल्या जीवनात असणारा सहभाग याबद्दल आपले मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे नियोजन गणेश बाहेती, अफरोज पठाण, प्रशांत नागरे, महेश गायकवाड, अतुल भंडारी, योगेश घैसास, अभय बारगजे, ईश्वर जावळे, संदीप खेडकर, लक्ष्मीकांत पारगावकर, बाळासाहेब तुपे, सुनंदा पाटील आदी वर्गमित्रांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जब्बार पठाण, सूत्रसंचालन मन्सूर शेख, नीता ढाकणे यांनी तर आभार विनया कुचेरिया व अनिल पालवे यांनी मानले.
या सुंदर कार्यक्रमाची सांगता पसायदानाने व दिवंगत झालेल्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करत पुन्हा एकदा भेटण्याचे आश्वासन देत झाली.
Tags :
11640
10