एम. एम .नि-हाळी विद्यालयात कला, कार्यानुभव कार्यशाळेचे आयोजन
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी शहरातील एम. एम. नि-हाळी विद्यालयात नुकतेच कला, कार्यानुभव कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या विद्यालयात दिवाळीनिमित्त विविध रंगीत पेपर वापरून रंगीबेरंगी आकाश कंदील बनवणे, ही कार्यशाळा आयोजित केली होती. त्यासाठी विद्यालयाचे कलाशिक्षक गणेश सरोदे यांनी आकाश कंदील रंगीत पेपरच्या सहाय्याने कसे बनवावे, याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
प्रात्यक्षिकाप्रमाणे विद्यालयातील इयत्ता पाचवी ते आठवी च्या एकूण ४७५ चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अगदी मनमुरादपणे, आनंदाने या कार्यशाळेत सहभाग घेऊन विविध प्रकारचे आकाश कंदील बनविले.
या उपक्रमाचे संस्थेचे सचिव अॅड. प्रतापराव ढाकणे, संस्थेचे विश्वस्त श्रीकांत नि-हाळी, संस्थेचे पदाधिकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय घिगे,उपमुख्याध्यापक पोपट शिरसाट, पर्यवेक्षक दत्तात्रय लवांडे,सांस्कृतिक विभाग प्रमुख विष्णू बुगे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी वृंद यांनी या उपक्रमाचे कौतुक व अभिनंदन केले.