पॅथॉलॉजी लॅबचालकाची 16 लाखांची फसवणूक, कोतवाली पोलिसांत चौघांवर गुन्हा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
केडगाव उपनगरात भागीदारीत सुरू केलेल्या एका खासगी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या अंतर्गत वादातून अचानक गाशा गुंडाळत हॉस्पिटलमधील पॅथॉलॉजी लॅबमधील 6 लाख 56 हजार 500 रुपयांच्या साहित्याची परस्पर विक्री करून डिपॉझिट म्हणून दिलेले 10 लाख रुपयेही परत न देता पॅथॉलॉजी लॅब चालकाची 16 लाख 56 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भालचंद्र अशोक साळवे (रा. वनकुटे, ता. पारनेर), डॉ. रामेश्वर विठ्ठलराव बंडगर (रा. सोईट धानोरा सालदेव, जि. यवतमाळ), सचिन गुंजाळ व आयेशा सय्यद अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत लॅबचे मालक अक्षय दत्तात्रय ढवळे (वय 28, रा. मांजरी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
अक्षय ढवळे रक्त, लघवी तपासणीचे कामकाज करतात. त्यांना डॉ. बंडगर यांनी केडगाव परिसरात सुविधा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल भागीदारीमध्ये सुरू केले असून, माझे भागीदार साळवे, सचिन गुंजाळ, आयेशा सय्यद यांच्यासोबत बोलून त्याठिकाणी पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्यास सांगितले. त्यामुळे ढवळे यांनी 13 ऑक्टोबर 2021 रोजी भालचंद्र साळवे, डॉ. रामेश्वर बंडगर यांच्यासोबत 5 वर्षांचा करारनामा करून चेकद्वारे 6 तसेच 4 लाख रोख रक्कम डिपॉझिट देऊन हॉस्पिटल येथे पॅथॉलॉजी लॅब सुरू केली.