महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू कार्यालयावर विद्यार्थ्यांकडून दगडफेक
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
रविवार दि. 31 जुलै रोजी पहाटे 1 ते 3 च्या दरम्यान संतप्त विद्यार्थ्यांच्या एका गटाकडून कुलगुरू कार्यालयात आसरा घेतलेल्या दुसर्या गटावर दगडफेक करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या दोन गटामध्ये रात्री दगडफेक झाल्याने एकच खळबळ उडाली.
समजलेली माहिती अशी : कृषि पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी या विद्यापीठात राज्यभरातून व देशातून ऑनलाईन विद्यार्थ्यांची निवड केली जाते. ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली त्यांना 70 हजार रुपये फी भरावी लागते. या विद्यापीठात एकूण 168 प्रवेश मर्यादा आहे. तथापि या विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये जवळपास 500 विद्यार्थी अनधिकृतपणे वास्तव्य करून राहात असून त्यांना कुठलीही हॉस्टेल किंवा मेस फी नाही.
त्यामुळे अधिकृत आणि अनधिकृत विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरून रात्री वादाची ठिणगी पडली. अनधिकृत विद्यार्थ्यांची संख्या अधिकृत विद्यार्थ्यांपेक्ष्या जास्त असल्याने अधिकृत विद्यार्थ्यांनी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी हॉस्टेल पासून जवळच असलेल्या कुलगुरू कार्यालयात धाव घेत आसरा घेतला.
या मुलांना मारण्यासाठी अनधिकृत 500 विद्यार्थ्यांच्या गटाने कुलगुरू कार्यालयावर जोरदार दगडफेक करीत हल्ला केला. तथापि या कार्यालयाबाहेर कार्यरत सुरक्षा रक्षकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. घडल्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे आप्पासाहेब ढुस यांनी केली आहे. ढुस म्हणाले, काही विद्यार्थ्यांनी कुलगुरु कार्यालयात असलेल्या सुरक्षा रक्षक शेटे यांच्या केबिनमध्ये आसरा घेतला होता. हे विद्यार्थी खूप घाबरलेले होते.
आम्हाला वाचवा म्हणत होते. आमचा मर्डर झाला तर त्याला जबाबदार कोण असे विचारीत होते. आम्ही फी भरून परीक्षा देऊन आलो तरी आम्हाला असे चोरा सारखे लपून बसावे लागते अशी खंतही त्यांनी बोलून दाखविली.