महाराष्ट्र
848
10
भाऊबीजेसाठी माहेरी गेलेल्या मावशी अन् भाचीचा दुर्देवी मृत्यू
By Admin
भाऊबीजेसाठी माहेरी गेलेल्या मावशी अन् भाचीचा दुर्देवी मृत्यू
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
दिवाळीनिमित्त भाऊबीजेची सर्वत्र धामधूम सुरू असताना कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव वारी येथे भाऊबीजेनिमित्त भावाकडे आलेल्या बहिणीचा व दुसऱ्या बहिणीच्या मुलीचा गोदावरी नदीवर धुणे धुत असतांना मुलाचा पाय घसरून पडल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात त्या दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
त्यात वणी, ता. दिंडोरी सपना जगदीश सोनवणे (वय 35 वर्ष) रा. वणी नाशिक व कु. राणी शरद शिंदे (वय 18 वर्ष) रा. म्हसरूळ नाशिक असे मयत झालेल्या महिलांचे नावे आहे. ऐन भाऊबीजेच्या दिवशी घडलेल्या या घटनेने अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात मोठी शोककळा पसरली आहे. (Unfortunate death of aunt niece who went home for bhaubeej at vani Nashik Latest Marathi News)
वणी येथून येथे माहेरी भाऊबीजेसाठी गेलेली बहिण म्हसरुळ येथील भाची ही भावास ओवाळून गावालगतच्या गोदावरी नदीकाठी कपडे धुण्यासाठी गेल्या असतांना नदीच्या पाण्यात पाय घसरुन पडलेल्या मावशी भाचीवर काळाने घाला घातला असून गोदावरी नदीच्या पाणीपत्रात बुडून मावशी भाचीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवार ता. 26 ऑक्टोबर रोजी दुपारच्या १२ वाजेच्या सुमारास घडली आहे.
या दुर्दैवी घटनेने कान्हेगावसह कोपरगाव तालुका व दिंडोरी व म्हसरुळ परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. सपना जगदीश सोनवणे, वय ३५ राहणार वणी नाशिक आणि गौरी शरद शिंदे वय १८ रा. म्हसरुळ नाशिक असे मृत्यु झालेल्या मावशी व भाचीचे नाव आहे. याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अर्चना उर्फ सपना जगदीश सोनवणे व गौरी शरद शिंदे हे कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव येथे दिवाळीच्या सुट्टी निमित्त मंगेश चव्हाण यांच्या येथे मामाच्या गावी आले असत बुधवार, ता. २६ रोजी सकाळी गोदावरी नदीला पाणी असल्याने नदीकाठी काही महिला व एक मुलगा धुणं धुण्यासाठी गेले होते.
भाऊबीज निमित्त कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव येथे मंगेश माणिकराव चव्हाण या भावाकडे 3 बहिणी तसेच भाचा-भाच्या आल्या होत्या. त्या आज सकाळी भाऊबीज आटोपून घरानजीक असलेल्या गोदावरी नदीच्या काठावर सकाळी 11 वाजेच्या सुमारास धुणे धुण्यासाठी गेल्या. अर्चना सोनवणे यांचा मुलगा पाण्याचा अंदाज न आल्याने काठावरून पाय घसरून पडल्याने त्याला वाचविण्यासाठी आई पाण्यात गेली.
त्यापाठोपाठ त्यांच्या तीन भाच्यांनी त्यांना वाचविण्यासाठी नदीत उडी घेतली असे एकूण पाच जण नदीत बुडत असतांना मामाचा मुलगा मंगेश चव्हाण (वय 14 वर्ष) याने 3 जणांना वाचविले. मात्र आत्या व दुसऱ्या आत्याच्या मुलीला तो वाचवू शकला नसल्याची माहिती उपस्थित नातेवाईकांनी दिली आहे. घटनेची माहिती वाऱ्यासारखी कान्हेगाव परिसरात पसरली, यावेळी अनेक जण नदीकाठी पोहोचले, त्यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी व त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना पाण्यातुन बाहेर काढून कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता तेथे उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
याबाबत कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीएसआय तुषार धाकराव पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह पोहोचून पंचनामा केला आहे. व अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. दरम्याम सपना सोनवणे यांच्यावर बुधवारी रात्री ९ वाजता वणी येथे अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. तर गौरी शिंदे यांच्यावर म्हसरुळ येथे अतिशय शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. सपना सोनवणे ह्या नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष तथा समता परीषदेचे तालुकाध्यक्ष जगदीश सोनवणे यांच्या पत्नी होत.
Tags :

