महाराष्ट्र
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार अनुदान दया – प्रताप ढाकणे
By Admin
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार अनुदान दया – प्रताप ढाकणे
पाथर्डी- प्रतिनिधी
मागील आठ ते दहा दिवसांपासून परतीच्या पावसाने शेवगाव व पाथर्डी तालुक्यात धूमाकुळ घातला असून हातातोंडाशी आलेली खरीप हंगामातील पिके जवळपास पूर्णतः वाया गेली असून शासनाने अतिवृष्टीग्रस्त बाधित पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट एकरी पन्नास हजार रुपयांचे अनुदान जाहीर करावे अशी मागील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस.प्रताप ढाकणे यांनी केली.
महाविकास आघाडीच्या वतीने तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून दोन्ही तालुक्यात काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस कोसळला.त्यामुळे खरीप हंगामातील कापूस,तूर,सोयाबीन,मूग,उदीड व बाजरी या पिकांना मोठा फटका बसला असून अनेक शेतातील पिके पावसाने झोडपली गेली आहेत किंवा अधिकच्या पाण्याने सडून गेली आहेत.ऐन सणासूदीच्या दिवसांत ही पिके शेतकऱ्यांनसाठी आथिॕक हातभार लावणारी होती मात्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले आहे.फळबागांचेही मोठे नुकसान झाले असून फळ उत्पादक शेतकऱ्यांनाही मदतीची गरज आहे.बाधित पिके व फळबागांचे तात्काळ पंचनामे नियम शिथिल करून करावे व शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रूपयांचे अनुदान देऊन त्यांची दिवाळी गोड करावी असे ढाकणे यांनी सांगितले निवेदनावर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, माजी नगरसेवक बंडू पाटील बोरूडे,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नासिर शेख,शहराध्यक्ष योगेश रासने, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमूख भगवान दराडे,देवा पवार,आतिष निर्हाळी,चंद्रकांत
भापकर,सचिन नागापुरे,जुने पठाण आदी उपस्थित होते.
शिवशंकर राजळे यांची आमदारांवर टीका - यावेळी तहसिल कार्यालया बाहेर बोलताना शिवशंकर राजळे यांनी आ.मोनिका राजळे यांच्यावर जोरदार टीका करत म्हणाले की स्थानिक आमदार यांनी मुंबईत जाऊन मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून पालकमंत्री विखे यांच्यावर दबाव आणत आहेत.पंचनामे करण्याची मागणी नगरलाही होऊ शकली असती त्यासाठी मुख्यमंत्री यांना भेण्याची काय आवश्यकता आहे.याचा अर्थ तुमचे पालकमंत्री यांच्याशी पटत नाही हे सिद्ध होते, प्रत्यक्ष शेत बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्याऐवजी मुंबईत जाऊन फार्स करण्याची आवश्यकता नव्हती.
Tags :
451
10