महाराष्ट्र
अध्यापनात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्यास यश निश्चित - सतिश गुगळे
By Admin
अध्यापनात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्यास यश निश्चित - सतिश गुगळे
पाथर्डी - प्रतिनिधी
- शिक्षण क्षेत्रात काम करतांना शिक्षकांनी सकारात्मक दृष्टी ठेवून काम केले , अध्यापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला , प्रचंड मेहनत करण्याची तयारी ठेवली , समोर निश्चित ध्येय ठेवले तर यश प्राप्त होते, असे प्रतिपादन श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव सतिश गुगळे यांनी व्यक्त केले.
श्री तिलोक जैन विद्यालयाच्या वतीने श्री आनंद फार्मसी कॉलेज येथे पार पडलेल्या पॉवरपॉईंट प्रेझेन्टेशन कार्यशाळा संस्थेअंतर्गत असलेल्या सर्व विद्यालयातील शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी ते अध्यक्ष पदावरून बोलत होते.
या वेळी व्यासपीठावर संस्थेचे विश्वस्त धरमचंद गुगळे , कार्यकारी मंडळाचे सदस्य डॉ. सचिन गांधी , चांदमल देसर्डा , प्राचार्य अशोक दौंड , सुभाष खेडकर , राजाराम माळी , उपप्राचार्य विजयकुमार छाजेड , पर्यवेक्षक संतोष चोरडिया , विजयकुमार घोडके , दिलावर फकीर , अनिल पटवा , सुधाकर सातपुते या सह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
या प्रसंगी भूषण कुलकर्णी हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी सर्व शिक्षकांना पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन चा अध्यापनामध्ये अत्यंत प्रभावीपणे वापर कसा करावा , त्याला विविध प्रकारचे इफेक्ट कसे द्यावेत , अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपले सादरीकरण अतिशय उत्कृष्ट कसे करावे, या विषयी उपस्थित सर्व शिक्षकांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच दुपारच्या सत्रामध्ये सर्व शिक्षकांसाठी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाचे आयोजन देखील करण्यात आले होते. यामध्ये सर्व शिक्षकांना संगणक उपलब्ध करून देण्यात आले व प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिक्षकांना पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली.
प्रशिक्षणामध्ये समन्वयक म्हणून संतोष घोगरे, सुनिल कटारिया , आतिश भावसार , आदिनाथ जायभाये , तरन्नूम शेख यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक श्री तिलोक जैन विद्यालयाचे प्राचार्य अशोक दौंड यांनी केले तर सुत्रसंचालन सुनिल कटारिया यांनी करून आभार श्री आनंद विद्यालय चिचोंडी शिराळ चे प्राचार्य सुभाष खेडकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. संतोष घोगरे, सुनिल कटारिया व आतिश भावसार यांनी विशेष प्रयत्न केले.
Tags :
758
10