पाथर्डी- जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांड: यांची निर्दोष मुक्तता
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यलागड्डा यांच्या न्यायालयात आज हा निकाल दिला.
20 ऑक्टोबर 2014 ला जवखेडे हत्याकांड होऊन या घटनेत संजय जाधव, त्यांची पत्नी जयश्री व मुलगा सुनील जाधव यांची हत्या झाली होती.
सरकारी पक्षाने आरोपींवर ठेवलेले आरोप ते सिध्द शकले नाही, असे निरीक्षक न्यायालयाने नोंदविले.
पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांड प्रकरणी प्रशांत उर्फ काळू दिलीप जाधव, अशोक दिलीप जाधव, दिलीप जगन्नाथ जाधव यांची जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.