पाथर्डीत शेतकऱ्याचा नादच खुळा"३ लाख ६१ हजाराला घेतली बैलाची जोडी
पाथर्डी:प्रतिनिधी
शेतकऱ्यांचा महत्वाचा समजला जाणारा बैल पोळा सण दोन दिवसांवर येऊन ठेपला या पार्श्वभूमीवर आज पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीतील आठवडे बाजारात बैलांची मोठी खरेदी विक्री होत आहे.यानिमित्त एका शेतकऱ्याने आज ३ लाख ६१ हजार रुपयांना उच्चांकी भावाने बैलाची जोडी खरेदी करत सजवलेल्या बैलाची डीजेच्या तालावर गुलालाची उधळण करत वाजत-गाजत मिरवणूक काढली.यावेळी ही मिरवणूक पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.