पाथर्डी- नोकरीसाठी तरुणाची पैसे घेवून फसवणूक; आर्मीमध्ये भरती करण्याचे आमिष
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथील युवकाची पैसे घेऊन आर्मीमध्ये भरती करतो असे आमिष दाखवून विश्वास संपादन करून आर्मीचे ड्रेस वरील खोटे फोटो,ओळखपत्र दाखवून पैसे घेऊन फसवणूक केल्या प्रकरणी नाशिक,नगर आणि बीड जिल्ह्यातील तीन आरोपी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथील युवक अमोल विष्णू खेडकर यास आरोपी १) बापू छबू आव्हाड राहणार आंबेगाव तालुका येवला जिल्हा नाशिक,२) सत्यजित भरत कांबळे राहणार आनंदवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर,३) राहुल सुमंत गुरव राहणार देवी बाबुळगाव तालुका जिल्हा बीड यांनी संगणमत करून आर्मीमध्ये पैसे घेऊन भरती करतो असे आमिष दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन करून आर्मीचे ड्रेस वरील खोटे फोटो ओळखपत्र दाखवून अमोल खेडकर यांचे कडून कडून वेळोवेळी एकूण ५,५०,०००/- रुपये रक्कम घेऊन बनावट कागदपत्र बनवून फसवणूक केली असल्या बाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील हे करत आहेत.