शेवगाव- वडूले बुद्रुक येथे शेत तलावामध्ये बुडून शेतकर्याचा मृत्यू
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील वडूले बुद्रुक येथे शेत तलावामध्ये बुडून शेतकर्याची मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याविषयी अधिक माहिती अशी, रविवारी दुपारच्या सुमारास शेतीसाठी पाणी चालू करण्यासाठी शेत तलावामध्ये मोटरला पाणी भरत असताना पाय घसरून अण्णासाहेब मोहनराव बुचकूल( वय ५० वर्षे) हे तलावात घसरले.
अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील वडूले बुद्रुक येथे शेत तलावामध्ये बुडून शेतकर्याची मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याविषयी अधिक माहिती अशी, रविवारी दुपारच्या सुमारास शेतीसाठी पाणी चालू करण्यासाठी शेत तलावामध्ये मोटरला पाणी भरत असताना पाय घसरून अण्णासाहेब मोहनराव बुचकूल( वय ५० वर्षे) हे तलावात घसरले. बराच वेळ झाल्यानंतरही ते अजून घरी का आले नाही, त्यामुळे घरचे त्यांना पाहण्यासाठी गेले असता त्यांच्या लक्षात आले कि ते पाण्यात बुडाले आहेत. त्यांना वर काढण्यासाठी, शहर टाकळी येथील पाणबुडीची मदत घेण्यात आली. पाणबुडीच्या माध्यमातून त्यांना बाहेर काढले. परंतु या सगळ्या प्रक्रियेत खूप वेळ गेल्याने यांचा मृत्यू झाला. गावकर्यांनी त्यांचा मृतदेह शवविच्छदेनासाठी ग्रामीण
रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या मागे आई, बंधू ,पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.