जिल्हा परिषदेत जाणार 'या' तालुक्यातून सात महिला; पंचायत समितीत सोळापैकी आठ महिला
By Admin
जिल्हा परिषदेत जाणार 'या' तालुक्यातून सात महिला; पंचायत समितीत सोळापैकी आठ महिला
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
जिल्हा परिषदेत गट सदस्याच्या आरक्षणामध्ये नेवासा तालुक्यातील जिल्हा परिषद गटात आठपैकी सात गट महिलांसाठी राखीव झाले आहे. तसेच पंचायत समितीत सोळापैकी आठ महिला असल्यामुळे नेवासा तालुक्यात खऱ्या अर्थाने महिलाराज अवतारणार आहे.
यामुळे मात्र पुरूषांचा मोठा हिरमोड झाला आहे.
नेवासा : जिल्हा परिषदेत गट सदस्याच्या आरक्षणामध्ये नेवासा तालुक्यातील जिल्हा परिषद गटात आठपैकी सात गट महिलांसाठी राखीव झाले आहे. तसेच पंचायत समितीत सोळापैकी आठ महिला असल्यामुळे नेवासा तालुक्यात खऱ्या अर्थाने महिलाराज अवतरणार आहे. यामुळे मात्र पुरूषांचा मोठा हिरमोड झाला आहे. यामुळे अनेकांना आपली आई, पत्नी, मुलगी यांच्यासाठी मैदानात उतरावे लागणार आहे.
जिल्हा परिषद गट : आरक्षण
बेलपिंपळगाव- अनुसूचित जमाती (महिला)
सलाबतपुर- सर्वसाधारण (महिला)
भेंडे बु- सर्वसाधारण (महिला)
भानसहिवरे- इतर मागास,(महिला)
पाचेगाव- अनुसूचित जमाती (पुरुष)
शनिशिंगणापुर : सर्वसाधारण(महिला)
सोनई :- इतर मागास: (महिला)
चांदा :- अनुसूचित जाती (महिला)
अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनिल गडाख,
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे
यांना आरक्षणामुळे जिल्हा परिषदेच्या मैदानात उतारता येणार नाही.
तसेच अनेक कार्यकर्ते गुडघ्याला बाशिंग बांधुन बसले होते.त्यांचा मोठा हिरमोड झाला आहे.मात्र महिलामध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळणार आहे.
-----
नेवासा पंचायत समिती आरक्षण
बेलपिंपळगाव : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
प्रवरासंगम :- अनुसूचित जाती महिला
खामगाव : सर्वसाधारण
सलाबतपुर : सर्वसाधारण
कुकाणा : सर्वसाधारण
भेंडा बुद्रुक : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
मुकिंदपुर : सर्वसाधारण महिला
भानसहिवरे : सर्वसाधारण महिला
पाचेगाव : अनुसूचित जमाती महिला
करजगाव : नागरिकांचा मागास प्रवर्ग
खरवंडी : सर्वसाधारण महिला
शनिशिंगणापुर :सर्वसाधारण महिला
सोनई : सर्वसाधारण महिला
घोडेगाव : अनुसूचित जाती
चांदा : सर्वसाधारण
देडगांव : नागरिकांचा मागास प्रवर्ग.