अहमदनगर-पाथर्डी महामार्गावर वाहतुकीत बदल; हे आहेत पर्यायी मार्ग
नगर सिटीझन टिम प्रतिनिधी
अहमदनगर-पाथर्डी महामार्गावर वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
पोलिस अधिक्षक राकेश ओला यांनी यासंदर्भातील आदेश काढले आहेत. हे आदेश १६ आणि १७ डिसेंबर रोजी लागू असणार आहेत.
मौजे भिंगार येथील बाराबाभळी ग्रामपंचायत हद्दीतील जामिया मोहमदिया इशातुल उलूम मदरशाच्या मैदानात 16 ते 17 डिसेंबर, 2022 या कालावधीत दोन दिवसीय इज्तेमा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे अहमदनगर-पाथर्डी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मुस्लीम बांधवांची गर्दी होईल. त्यामुळे रस्ते वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वाहतुकीची कोंडी होऊ नये व रहदारी सुरळीत होण्यासाठी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम 33 (1) (ब) नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करत 16 डिसेंबर रोजी सकाळी 6-00 वाजल्यापासुन ते 17 डिसेंबर, 2022 रोजी रात्री 12-00 वाजेपर्यंत अहमदनगर-पाथर्डी महामार्गावर खालीलप्रमाणे एकेरी वाहतुकीचे आदेश निर्गमित केले आहेत.
अहमदनगर कडून पाथर्डीकडे जाणारी सर्व प्रकारची हलकी वाहतूक सुरळीतपणे सुरू राहील. अहमदनगरकडून पाथर्डीकडे जाणारी सर्व प्रकारचे अवजड वाहतुकीकरीता मार्ग- जीपीओ चौक- चांदणी चौक मुट्ठी चौक-कड़ा-आष्टी मार्गे असा राहणार असून पाथर्डीकडून अहमदनगरकडे येणारे सर्व प्रकारची वाहने चाँदबीबी महाल पायथा -साळोरा बद्दीफाटा- मौजे सारोळा बद्दीमार्गे जामखेड महामार्गावरुन-अहमदनगर अशी जातील. हा आदेश इज्तेमा मेळाव्यास येणारे वाहने, शासकीय वाहने, अॅम्ब्युलन्स, फायर ब्रिगेडची वाहने व इतर अत्यावश्यक कारणांमुळे स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणार नसल्याचेही एका आदेशान्वये कळविले आहे.