महाराष्ट्र
ज्ञानेश्वर साखर कारखाना विरोधात 'या' कारणांमुळे शेतकर्यांचे उपोषण
By Admin
ज्ञानेश्वर साखर कारखाना विरोधात 'या' कारणांमुळे शेतकर्यांचे उपोषण
कारखान्याकडून दिशाभूल
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
2021-22 च्या गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकर्यांचे कपात केलेले प्रतीटन 109 रुपये प्रमाणे रक्कम परत मिळण्यासाठी लोकनेते मारुतराव घुले पा.
ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना विरोधात शहरटाकळी येथील जनशक्ती पक्षाने उपोषण सुरू केले आहे. भाऊसाहेब भानुदास राजळे, मनोज अर्जुन घोंगडे, भागचंद किसन कुंडकर, सुनील रामभाऊ गवळी हे येथील हनुमान मंदिरात गुरूवारपासून (दि.5) उपोषणास बसले आहेत. संघटनेसाठी नव्हे तर सभासदांनी प्रपंच्यासाठी एकत्र या, असे आवाहन करत जनशक्ती विकास आघाडी, शेवगाव-पाथर्डी शहरटाकळी शाखेच्यावतीने आमरण उपोषण करण्यात येत आहे. अनेक सभासद शेतकर्यांनी उपोषणस्थळी भेट देत पाठिंबा दर्शविला आहे.
ज्यांनी ज्यांनी 2021-22 गळीत हंगामामध्ये लोकनेते मारुतराव घुले सह. साखर कारखान्याला ऊस घातलेला, त्या शेतकर्यांचे 109 रुपये प्रमाणे कपात केले आहेत. ही कपात ऊस उत्पादक शेतकर्यांना अमान्य असल्याचा दावा उपोषणकर्त्यांनी केला आहे. कपातीची रक्कम परत मिळावी यासाठी भातकुडगाव येथील ऊस परिषदेमध्ये ठराव घेत तशी मागाणी पूर्वीच केली आहे. तसा पत्रव्यवहार साखर संचालक, साखर उपसंचालक तसेच ज्ञानेश्वर कारखान्याचे कार्यकारी संचालकांना केला असल्याचे सांगण्यात आले. साखर आयुक्त आणि कारखाना प्रशासनाने त्यावर कोणतीच कार्यवाही न केल्याने उपोषण सुरू केल्याचे सांगण्यात आले. अहमदनगर प्रादेशिक साखर उपसंचालक डॉ. प्रविण लोखंडे यांनी गुरूवारी सायंकाळी उपोषणस्थळी भेट दिली. मात्र त्यांची मध्यस्थी निष्प्रभ ठरली. कपात केलेले 109 रुपये प्रतिटन हे शेतकरी खात्यावर जमा करणार, अशी लेखी दिल्याशिवाय उपोषण न सोडण्यावर उपोषणार्थींनी सांगितले.
कारखान्याकडून दिशाभूल
उपोषणकर्ते यांच्या भेटीला आलेले प्रादेशिक साखर उपसंचालक डॉ. प्रविण लोखंडे यांनी ज्ञानेश्वर कारखाना यांच्याकडून आणलेल्या कागदपत्रात कपात केलेले 109 रुपये शेतकर्यांच्या संमतीने कपात केल्याचे सांगितले. कपातीचे 109 रुपये नको असे नाव, सह्यानिशी सांगणारी दोन पानी यादी उपोषणकर्त्यांना दाखविली असता त्यातील 10-15 शेतकरी हे भूमिहिन असल्याचे समोर आले. यादीत नाव असलेले दोन शेतकरी उपोषणस्थळी उपस्थित होते. त्यांनी नावासमोर सही केली नसल्याचा दावा करत उसही नसल्याचे सांगितले. त्यामुळे कारखाना प्रशासनाकडून उपोषणकर्ते व साखर आयुक्तांची दिशाभूल झाल्याचे समोर आले.
Tags :
511785
10