कविवर्य बाळासाहेब कोठुळे काव्यरत्न पुरस्काराने सन्मानित
पाथर्डी प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील ज्येष्ठ कवी श्री बाळासाहेब कोठुळे यांना काव्यरत्न हा पुरस्कार गोकुळ बालसंस्कार सामाजिक संस्था जिल्हा ठाणे यांच्या वतीने जेष्ठ गझलकार रज्जाक शेख यांच्या शुभहस्ते नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड या ठिकाणी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड बाबा आरगडे हे होते यावेळी झालेल्या कार्यक्रमांमध्ये व्यासपीठावर प्रमुख मान्यवर प्रसिद्ध चित्रकार भरत कुमार उदावंत कवयित्री कल्पना निंबोकार दैनिक साहित्य सेवा चे संपादक नितीन गायके आदी मान्यवर उपस्थित होते कवी बाळासाहेब कोठुळे हे अनेक वर्षापासून कविता कथा लेख निबंध वात्रटिका विडंबन असे लिखाण करतात व त्याचबरोबर सूत्रसंचालनही करतात त्यांची अनेक साहित्यिक संस्थेची नाळ जोडली आहे अहिल्यानगर येथील शब्दगंध साहित्य परिषदेचे ते तालुका प्रसिद्धीप्रमुख म्हणून काम पाहतात तसेच एकता फाउंडेशन चे ते अहिल्यानगरचे प्रसिद्धी प्रमुख म्हणून काम करतात भ्रष्टाचार निर्मूलन या संस्थेचे पाथर्डी तालुक्याचे ते सचिव म्हणून काम करतात तसेच डब्ल्यू सीपीए या संस्थेचे महाराष्ट्राचे सचिव म्हणून काम करतात अनेक दैनिकांमधून सातत्यपूर्ण लेखन करून समाजातील वंचित घटकांना त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे आत्तापर्यंत त्यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन साठ राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहे त्याबद्दल चितळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे कौतुक करण्यात आले तसेच डब्ल्यू सी पी ए चे महाराष्ट्र चॅप्टर चे अध्यक्ष डॉक्टर दत्ता वीघावे व एकता फाउंडेशनचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अनंत कराड व गोकुळ बालसंस्कार संस्थेचे अध्यक्ष संतोष साखरे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.