महाराष्ट्र
85820
10
शासकीय बालचित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न
By Admin
शासकीय बालचित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न
कलाशिक्षक लक्ष्मण देशमुख यांना पाथर्डी कलाभूषण पुरस्कार
पाथर्डी प्रतिनिधी :
- पंचायत समिती (शिक्षण विभाग ) पाथर्डी व तालुका कलाशिक्षक संघटनेच्या वतीने शासकीय बालचित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न झाले.यावेळी तिसगाव येथील कलाशिक्षक लक्ष्मण देशमुख यांना पाथर्डी कलाभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पंचायत समितीच्या स्व. गोपिनाथ मुंढे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अहमदनगर जिल्हा कलाशिक्षक संघटनेचे अध्यक्ष गझलकार संजय पठाडे, गटशिक्षणाधिकारी अनिल भवार , पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पालवे , विस्तार अधिकारी लहू भांगरे उपस्थित होते.
यावेळी तालुकास्तरीय बालचित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. यात ० ते ७ गटात प्रथम क्रमांक : कल्याणी भरत नांगरे ( जि. प. शाळा मोहोज बु.॥ ), द्वितीय क्रमांक : ज्ञानेश्वरी गणेश घोरपडे ( जि. प. शाळा शिंगवे केशव ), तृतीय क्रमांक : श्रुती संदिप खाडे ( जि. प. शाळा मोहोज बु.॥ ), ७ ते ९ गटात प्रथम क्रमांक : समृद्धी साईनाथ राजळे ( जि. प. शाळा कासार पिंपळगाव ), द्वितीय क्रमांक : संध्या संतोष आढाव ( जि. प. शाळा इंदिरानगर सातवड ), तृतीय क्रमांक : सिद्धार्थ गणेश सरोदे ( बी. डी. एस. स्कूल पाथर्डी ),९ ते १२ गटात प्रथम क्रमांक : वेदांत संजय शेटे ( एम.एम.निहाळी विद्यालय पाथर्डी ) , द्वितीय क्रमांक : संस्कृती बप्पासाहेब हिंगे ( संत ज्ञानेश्वर विद्यालय पाथर्डी ), तृतीय क्रमांक : तन्वी अतुल तरवडे ( विवेकानंद विद्या मंदिर पाथर्डी), तर १२ ते १६ गटात प्रथम क्रमांक : समृद्धी राजेंद्र मतकर (श्री कानिफनाथ विद्यालय जवखेडे ), द्वितीय क्रमांक : कृष्णा आदिनाथ शेरकर ( न्यू इंग्लिश स्कूल आदिनाथनगर ), तृतीय क्रमांक : विशाल आजिनाथ डोंगरे ( श्रावण भारती बाबा प्रशाला मुंगुसवाडे ) या विद्यार्थ्यांनी पारितोषिके पटकावली. तसेच राष्ट्रीय मतदार दिवस - तालुका चित्रकला स्पर्धेत - लहान गटात अथर्व रामनाथ जाधव व मोठा गट : समृद्धी राजेंद्र मतकर ( श्री कानिफनाथ विद्यालय जवखेडे ) या दोघांनीही प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले.
तिसगाव येथील शरदचंद्र पवार माध्य. विद्यालयातील अष्टपैलू कलाशिक्षक लक्ष्मण देशमुख यांना पहिला पाथर्डी कलाभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक भाऊसाहेब आठरे, कला गुरुवर्य सुरेश शहाणे , संगीत विशारद पानगे मॅडम , आयुब पठाण , पालक, विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते.
याप्रसंगी गझलकार पठाडे यांनी गझल सादर करून उपस्थितांची मने जिंकली. पाथर्डी तालुका अध्यक्ष संजय ससाणे यांनी संघटनेच्या उपक्रमांविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी कांबळे ( गटविकास अधिकारी )यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले.
तालुका सचिव किशोर जगताप यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष गणेश सरोदे यांनी सूत्रसंचालन केले तर महिला विभाग प्रमुख नगमा खान यांनी आभार मानले. याप्रसंगी सभागृहातील विद्यार्थी व कलाशिक्षक यांच्या चित्रकला प्रदर्शनाचे सर्वांनी कौतुक केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा उपाध्यक्ष आत्माराम दहिफळे, कार्याध्यक्ष संजय गटागट, अंबादास लाड, आयुब सय्यद, दिपक राठोड ,निलेश गणगले यांनी प्रयत्न केले.
Tags :
85820
10





