पाथर्डी- चोरीच्या उद्देशाने शेतमालकाचा खून करणारे आरोपी अटकेत
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
चोरीच्या उद्देशाने शेतमालकाचा खून करणारे 3 आरोपी स्थानिक गुन्हे शाखा विभागाने पकडले असून या गुन्ह्याचा छडा लवकरच लागला आहे. भाऊसाहेब अशोक निकम व 22, रा. लोहगांव, ता. पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, अशोक संजय गिते वय 23, श्रीकांत रावसाहेब सुर्यवंशी (20, दोन्ही रा.
कडगांव मिरीरोड, ता. पाथर्डी) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे
मिळालेल्या माहितीनुसार, सुमनबाई कारभारी शिरसाठ (वय 55, रा. कडगाव शिवार, ता. पाथर्डी) यांचे पती कारभारी रामदास शिरसाठ (वय 59) हे त्यांच्या घराजवळ असलेल्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये कापसाच्या गोण्याला राखण झोपलेले असताना दि.10 नोहेबर 23 रोजी रात्री आरोपींनी शेडमधील कापसाच्या 7-8 गोण्या चोरुन नेताना कारभारी यांनी पकडले. त्यांनी विरोध केला असता आरोपींनी मारहाण करुन त्यांची हत्या केली होती.सदर घटने बाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शेवगांव पोलीस चोरीच्या उद्देशाने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास लावण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिले होते. त्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने लागलीच घटना ठिकाणास भेट देऊन परिसरात फिरुन रेकॉर्डवरील आरोपी, कापुस विकत घेणारे व्यापारी तसेच मयताचे शेतावरील शेत मजुरा बाबत माहिती घेवुन दिनांक 13 रोजी संशयीतांची नावे निष्पन्न करुन त्यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल व बारकाईने चौकशी करता या तिन्ही आरोपींचा शोध लागला.या तिघांनी त्यांचा साथीदार करण अजिनाथ कोरडे, रा. कडगांव, ता. पाथर्डी (फरार) याच्यासह कारभारी यांची हत्या केल्याची कबुली दिल्याने आरोपींना ताब्यात घेऊन पाथर्डी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.