महाराष्ट्र
23430
10
चैतन्य अर्बन को. ऑप क्रेडिट सोसायटीचा वर्धापन दिन उत्साहात संपन्न
By Admin
चैतन्य अर्बन को. ऑप क्रेडिट सोसायटीचा वर्धापन दिन उत्साहात संपन्न
मधुमेह तज्ञ डॉ. गोपाल बहुरूपी यांचे मधुमेह- उपचार व प्रतिबंध विषयी मार्गदर्शन
पाथर्डी प्रतिनिधी:
पाथर्डी शहरातील चैतन्य अर्बन को. ऑप क्रेडिट सोसायटी लि च्या तृतीय वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित प्रसिद्ध मधुमेह तज्ञ डॉ. गोपाल बहुरूपी यांच्या "मधुमेह- उपचार व प्रतिबंध" या विषयावरील मार्गदर्शनचा कार्यक्रम दि. ६ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून शेवगांव-पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजळे व अध्यक्षस्थानी श्री क्षेत्र मोहटादेवी देवस्थानचे विश्वस्त डॉ. श्रीधर देशमुख हे उपस्थित होते.
आपला आहार संतुलित ठेवणे व नियमित व्यायाम करणे, यामुळे मधुमेहाचा रुग्ण नक्कीच निरोगी आयुष्य जगू शकतो, असे डॉ. बहुरूपी यांनी बोलतांना सांगितले.मधुमेहाचे रुग्ण खूप भाग्यवान आहेत की, देवाने तुम्हाला एवढा गोड आजार दिला आहे,परंतु आपण पथ्य न पाळून त्याला कडू रोग करतो,असे सांगून मधुमेहाच्या रुग्णांना अतिशय खेळीमेळीच्या व अगदी सोप्या व सर्वांना समजेल अशा भाषेत मधुमेहाविषयी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकात चैतन्य अर्बन चे चेअरमन अनंत ढोले यांनी मागील तीन वर्षातील चैतन्य अर्बन व चैतन्य ग्रुप कशा पद्धतीने प्रगती करत आहे व भविष्यात कुठल्या दिशेने भरघोस प्रगती करणार आहोत, याबद्दल सविस्तर माहिती दिली. चैतन्य फाउंडेशनच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध सामाजिक कार्यांची माहिती, यावेळी त्यांनी दिली,त्यास उपस्थित पाथर्डीकरांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमास पाथर्डी पंचायत समितीचे मा. सभापती गोकुळ दौंड,मनसेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर,ज्येष्ठ पत्रकार कैलास ढोले, दादासाहेब येढे, राजेंद्र चव्हाण, विजय ढोले,न्यूक्लिअस हॉस्पिटल,अहमदनगरचे संचालक डॉ. सुधीर बोरकर,निमाचे पाथर्डी तालुकाध्यक्ष डॉ. सुहास उरणकर,डॉ. जगदीश मुने,डॉ. राहुल देशमुख,डॉ. सागर भापकर,डॉ. योगेश वाकचौरे,डॉ. अंबिका वाघ-वाकचौरे,डॉ. शिरीष जोशी,जवाहर क्लॉथ स्टोअरचे संचालक सुशील बाहेती,विश्वजित अर्बन शेवगांवचे चेअरमन विनायक देहाडराय,समृद्धी पतसंस्था कुकण्याचे चेअरमन दादासाहेब गवळी,जनता सहकार अर्बन शेवगांवचे चेअरमन संदीप देवढे व पाथर्डीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. चैतन्य परिवार सातत्याने समाजपयोगी कार्यक्रम घेत असतात,त्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चैतन्य अर्बनचे संस्थापक/ अध्यक्ष अनंत ढोले यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. शेख यांनी केले तर आभार चैतन्य अर्बनचे शाखा व्यवस्थापक राधेशाम हाडके यांनी मानले.
Tags :
23430
10





