बाहेर कोरोना अन् घरात भूकंपाची भीती; संगमनेर तालुक्यात सौम्य धक्के
नगर सिटीझन live टिम-
संगमनेर तालुक्यातील बोटा, घारगाव व परिसरातील गावांमध्ये गुरुवारी (दि. 25) दुपारी भूगर्भातील हालचालींचे सौम्य स्वरूपाचे धक्के बसले. काही तासांच्या अंतरावर जाणवल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. बाहेर कोरोना आणि घरात भूकंपाची भीती अशी अवस्था निर्माण झाली आहे.
बोटा व घारगाव परिसरात गुरुवारी दुपारी ३.३६ ते ४.३७ वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले असल्याचे परिसरातील संग्राम काकड, शरद गाडेकर, सुभाष मुसळे, शंकर पानसरे, गणेश नरवडे यांनी सांगितले. बोटा, घारगाव, आंबी-दुमाला, कुरकुटवाडी, म्हसवंडी, अकलापूरसह नजीकच्या पुणे जिल्ह्यातील आळेफाटा, वडगाव आनंदमध्ये धक्का जाणवल्याने नागरिकांनी सांगितले.
दरम्यान, यापूर्वी काही वर्षापासून बोटा व घारगाव परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले होते. याप्रकरणी नाशिक येथील भूकंपमापन यंत्रावर याची नोंद झाल्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर अली नाही. त्यामुळे पठारावरील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.