पाथर्डी- सकल मराठा आक्रमक,पुढा-यांना गाव बंदी
सकल मराठा समाजांच्या भुमिकेला ग्रामस्थांचा पाठिंबा
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी येथे राजकीय नेत्यांना गाव बंदी केली असून,जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय नेत्याला गावात प्रवेश दिला जाणार नाही. अशी शपथ सकल मराठा समाजामधील तरूणानी हनुमान टाकळी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातील आयोजित बैठकीत घेतली आहे.या निर्णयाला बैठकीत उपस्थित बहूसंख्य बांधवांनी जाहीर पाठींबा दर्शविला आहे.याबाबत तहसीलदार साहेब, पोलीस प्रशासनास निवेदन देण्यात आले आहे.सदरच्या निवेदनावर शेकडो सकल मराठा समाजांच्या सह्या आहेत.गुरीवारी शिर्डी येथील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी लोकांना नेण्यासाठी आलेल्या लक्झरी व एस.टी.बस मोकळ्याच मागे परत गेल्या.यावेळी
उठ मराठा जागा हो, आरक्षणाचा धागा हो!
एक मराठा ,लाख मराठा,
एकच मिशन ,मराठा आरक्षण
अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यानंतरचा पुढचा टप्पा बेमुदत साखळी उपोषणाचा असेल असं सर्वानुमते ठरले.मराठा समाजाची ही आरपारची लढाई आता ख-या अर्थाने सुरू झाली आहे.मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आणि आपल्या भावी पिढीचे भविष्य उज्वल करण्यासाठी सर्व मराठा समाजाने आपला सहभाग नोंदविला पाहिजे असे आवाहन यावेळी सकल मराठा समाजाने केले.
मराठा तरुणांनी कमालीच्या शांततेच्या मार्गाने केलेल्या या आंदोलनाचे गावकऱ्यांनी कौतुक केले.