महाराष्ट्र
17541
10
आमोद नलगे यांचा राज्य स्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मान
By Admin
आमोद नलगे यांचा राज्य स्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मान
अहमदनगर - प्रतिनिधी
सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा ऊमटवणारे सामाजिक कार्यकर्ते आमोद नलगे यांना स्व.पै.किसनराव डोंगरे बहुउद्देशिय संस्था,श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय निमगाव वाघा यांच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा राज्य स्तरीय समाजरत्न पुरस्कार नुकताच देण्यात आला.
यापूर्वीही त्यांना सामाजिक उल्लेखनीय कार्याबद्दल 2021-22 चा लोकसत्ता संघर्ष मार्फत दिला जाणारा समाज भुषण पुरस्कार देण्यात आला आहे.
आमोद नलगे भारत सर्व सेवा संघ शिक्षण संस्थेच्या पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात शिक्षक आहेत. संस्थापक स्व. सुरेशराव भाऊराव नलगे यांचे चिरंजीव असून बालपणापासूनच त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे. यांनी कोळगांव यात्रेत मोफत शरबत वाटप,वृक्षारोपण व जतन,रक्तदान,गरजूंना मदत, शाळेला मदत ,कोरोणा काळात गरजूंना अन्नदान, किराणामाल वाटप असे अनेक उपक्रम राबविले आहेत.
तसेच राजकीय क्षेत्रातही त्यांनी अनेक पदे ऊपभोगली असून त्यातून त्यांनी समाज कार्यच केले आहे. आपल्या राजकीय क्षेत्राची सुरुवात त्यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष पदावरून केली त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ग्राहक मंच अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष ,भाजपा युवा तालूका उपाध्यक्ष, कोळगांव तंटामुक्ती सदस्य अशी अनेक पदे उपभोगली यातून त्यांनी समाजकल्याणच साधले आहे.
धार्मिक कार्यातही ते अग्रभागी असतात स्वामी शिवानंद दादाजी परीवाराचे ते साधक आहेत. जाणता राजा या आशिया खंडातील सर्वात मोठ्या महानाट्यातही त्यांनी रांजाच्या पाटलाचे हातपाय कलम करणार्या किल्लेदाराची प्रमुख भूमिका बजावली आहे.ते शैक्षणिक क्षेत्रातही अग्रेसर असून त्यांनी शिक्षक ,शिक्षकेत्तर बांधवांच्या अनेक आंदोलनामध्ये भाग घेऊन न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे .ते जिल्हा शैक्षणिक समन्वय समितीचे सदस्य असून शिक्षकेत्तर संघटनेचे नेते आहेत. तसेच ईब्टा शिक्षक शिक्षकेत्तर संघटनेचे अहमदनगर जिल्हा सचिव आहेत. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबाबत शैक्षणिक,सामाजिक, राजकीय सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. पुरस्काराने मी आनंदी आहे पण यापेक्षाही मी समाजकारण करतांना मी जास्त आनंदी असतो तो आनंद आणि जनतेचं प्रेम हाच माझा खरा पुरस्कार आहे. शेवटच्या श्वासापर्यंत आपण समाजकारण, राजकारणातून समाजकारण, धार्मिकतेतून समाज प्रबोधन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच काव्य व नाट्यातून आपण समाजाचे मनोरंजन करणार असल्याचे अमोद नलगे यांनी सांगितले.
या पुरस्काराच्या वेळी लोकनेते मा.आमदार श् निलेश लंके, जि. प.सदस्य माधवराव लामखडे,अध्यक्ष शब्दगंध साहित्य परिषद राजेंद्र उदागे,पो.उपनिरीक्षक कोतवाली पोलीस स्टेशन अ.नगर
सचिन रणशेवरे , सिने अभिनेते अशिष सातपुते,अनिता काळे, स्व. पै.किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. नाना डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते .
Tags :
17541
10





