महाराष्ट्र
94175
10
प्रयत्न केल्यावर जगामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही
By Admin
प्रयत्न केल्यावर जगामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही- उपनिरीक्षक सचिन लिमकर
एम. एम. नि-हाळी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ
पाथर्डी प्रतिनिधी:
शहरातील एम. एम नि-हाळी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सुस्वागतम या गीताने करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य संजय घिगे यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाथर्डी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सचिन लिमकर होते.तसेच प्रमुख अतिथी मध्ये संस्थेचे विश्वस्त सिद्धेश ढाकणे व समन्वयक सुखदेव तुपे. हे उपस्थित होते.
सचिन लिमकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून ज्या विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळाले त्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.आणि ज्या विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळाले नाही, अशा विद्यार्थ्यांनी हतबल न होता पुढील वर्षी अधिक प्रयत्न करून पारितोषिक मिळवावे. प्रयत्न केल्यावर जगामध्ये कुठली गोष्ट अशक्य नाही.शेवटी यश हमखास मिळते.त्यांनी "वाळूचे कण रगडीता तेलही गळे" या म्हणीचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे कौतुक केले. आणि पाथर्डी तालुक्यातील सर्वात जास्त विद्यार्थी पोलीस भरतीत उत्तीर्ण होऊन पोलीस सेवेत रुजू झालेली आहेत हे सांगितले.परिस्थिती माणसाला सर्व काही शिकवत असते.परिस्थितीची काळजी न करता प्रयत्न करणे गरजेचे आहे.शेवटी भाषणामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलचा वापर कमी करावा, असे विद्यार्थ्यांना आवाहन केले.आणि विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.संस्थेचे समन्वयक एस पी तुपे यांनी देखील विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषणातून मौलिक असे मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य संजय घिगे, पर्यवेक्षक दत्तात्रय लवांडे,भाग्यश्री वाकडे, पी. टी. बांगर, श्री डागा, जनार्दन बोडखे,शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधाकिसन कोठे व छाया नि-हाळी यांनी केले तर विष्णुपंत बुगे यांनी आभार मानले.
Tags :
94175
10





