संदिप राजळे यांचा भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश
अहमदनगर -
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील युवा नेते, प्रगतशील शेतकरी, कृषिमिञ संदिप राजळे यांनी
तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री मा.चंद्रशेखर राव (KCR) यांचे उपस्थितीत नांदेड येथे भारत राष्ट्र समिती बीआरएस या पक्षात प्रवेश केला असून पक्षातील सदस्यपदी निवड झाली आहे. राजळे शेतकरी कुटुंबातील असून गेल्या वीस वर्षापासून राजकीय,सामाजिक,धार्मिक क्षेत्रात काम करत असून अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. उत्तम संघटन कौशल्य असून काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस,मराठा संघटना अशा राजकीय पक्षात ग्रामीण भागात काम केले आहे. परीसरात तरुणांना शेती,उद्योग यासंबंधी मार्गदर्शन करतात.लोकांच्या सुख दुःखात सहभागी होतात.अनेक शेतकऱ्यांच्या प्रश्नासंबधी जन आंदोलन केले असून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न केले आहेत.भारत राष्ट्र समिती पक्ष तालुक्यात,जिल्ह्यात वाढविण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणे काम करणार आहे.तेलंगणा राज्यातील ध्येय धोरणे तसेच राज्यातील झालेल्या विकास संबंधी माहिती नागरिकांपर्यत पोहचवणार आहे.अशी माहीती राजळे यांनी दिली आहे.