महाराष्ट्र
ऊस साखर कारखान्याचे अहमदनगर जिह्यात 54 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप
By Admin
ऊस साखर कारखान्याचे अहमदनगर जिह्यात 54 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नगर जिह्यात दरवर्षी साखरेचे उत्पादन मोठय़ा प्रमाणामध्ये होत असते. नगर जिल्हा 'साखरेचा जिल्हा' म्हणून ओळखला जातो. जिह्यातील 16 साखर कारखान्यांनी 6 जानेवारीपर्यंत 54 लाख 37 हजार 204 मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, त्यापासून 49 लाख 10 हजार 380 साखरपोत्यांचे उत्पादन झाले आहे.
दैनंदिन साखर उतारा 10.47 असा आहे.
नगर जिह्यामध्ये मागील तीन वर्षांमध्ये साखरेचे चढ-उतार पाहायला मिळाले. कोरोनाकाळात दोन वर्षे शेतकऱयांसह साखर कारखान्यांना मोठा फटका बसला होता. त्यावेळेला कामगार न मिळाल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. काही ठिकाणी ऊसतोड झाली नाही, तर काही ठिकाणी ऊस तोडूनसुद्धा त्याचा उपयोग झाला नव्हता. यंदा पाऊस मोठय़ा प्रमाणामध्ये झाल्यामुळे सर्वच पिके चांगली येऊन नगर जिह्यामध्ये उसाचे उत्पादन वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त होत होता.
नगर जिह्यामध्ये उत्तर भागामध्ये म्हणजेच शिर्डी, राहुरी, लोणी, संगमनेर, कोपरगाव, राहाता, नेवासा हा परिसर ऊसक्षेत्र म्हणून ओळखला जात असल्यामुळे त्या ठिकाणी उसाची लागवड मोठय़ा प्रमाणामध्ये झाली. आजही टप्प्याटप्प्याने अनेक ठिकाणी ऊसतोडीच्या टोळ्या कार्यरत झालेल्या आहेत. नगर जिह्यामध्ये सहकारी व खासगी कारखानदारी असल्यामुळे येथे उसाला चांगल्या दर दिला जात आहे.
यंदा कारखाने कशा पद्धतीने चालतील, याची शक्यता सुरुवातीला नव्हती. मात्र, टप्प्याटप्प्याने कारखाने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. एफआरपीप्रमाणे भाव देण्यात यावा, असा निर्णय झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी सर्व कारखान्यांमार्फत सुरू आहे. अनेक शेतकऱयांच्या खात्यामध्ये पैसेसुद्धा जमा झाले आहेत.
नगर जिह्यातील साखर कारखान्यांचे गाळप मेट्रिक टनात. (कंसात साखरपोते व दैनंदिन साखर उतारा) पुढीलप्रमाणे ः अंबालिका ः 8 लाख 19 हजार 350 मे. टन, (8 लाख 11 हजार 150 साखर पोते, 11.04 साखर उतारा), मुळा ः 5 लाख 32 हजार 110 मे. टन (371600 पोती, 11.04 उतारा), थोरात ः 5 लाख 22 हजार 950 मे. टन, (572990 पोती, 13.00 उतारा), ज्ञानेश्वर ः 5 लाख 72 हजार 750 मे. टन, (511950 पोती, 10.90 उतारा), सहकार महर्षी नागवडे श्रीगोंदा ः 3 लाख 92 हजार 900 मे. टन, (374375पोती, 10.84 उतारा), पद्मश्री विखे-पाटील ः 4 लाख 16 हजार 650 मे. टन, (315250 पोती, 11.20 उतारा), कुकडी ः 3 लाख 13 हजार 400 मे. टन, (300800 पोती, 10.63
उतारा), अशोक ः 2 लाख 84 हजार 260 मे. टन, (274000 पोती, 11.55 उतारा), सहकार महर्षी शंकरराव कोल्हे ः 3 लाख 11 हजार 187 मे. टन, (240825 पोती), वृद्धेश्वर
2 लाख 02 हजार 835 मे. टन, (196250 पोती, 11.25 उतारा), अगस्ती ः 2 लाख 15 हजार 161 मे. टन, (217110 पोती, 11.33 उतारा), कर्मवीर शंकरराव काळे ः 2 लाख 11 हजार 071 मे. टन, (217900 पोती, 11.75 उतारा), गंगामाई ः 4 लाख 58 हजार 250 मे. टन, (339650 पोती, 10.92 उतारा), गणेश ः 61 हजार 300, (50250 पोती, 11.00 उतारा), पियूष ः 1 लाख 23 हजार 230 मे. टन, (116280 पोती).
Tags :
471803
10