पाथर्डी- घरकुल योजनांचे मंजूर असलेले घरे अनुदान घेऊनही बांधकाम सुरू न केलेले लाभार्थी यांना लोक आदालतीच्या नोटीस
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
तालुका विधी सेवा समिती पाथर्डी व पंचायत समिती पाथर्डी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित लोकन्यायालय दिनांक 11 फेब्रुवारी 2023 रोजी पाथर्डी न्यायालय येथे आयोजित करण्यात आले पाथर्डी तालुक्यातील प्रत्येक गावातील घरपट्टी पाणीपट्टी गाळा भाडे टॉवर कर इत्यादी विविध कराची थकबाकी असणारे लाभार्थी व केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजनांचे मंजूर असलेले घरे अनुदान घेऊनही बांधकाम सुरू न केलेले लाभार्थी यांना लोक आदालतीच्या नोटीस बजावून आज रोजी न्यायालयात हजर राहणे विषयी कळविण्यात आले. लोक आदालतीसाठी मा. विस्तारअधिकारी श्री मल्हारी इसारवाडेसाहेब श्री गहिरे साहेब श्री रानमल साहेब ग्रामसेवक श्री सचिन नजन श्री प्रमोद म्हस्के श्री रवी देशमुख श्री हनुमान खेडकर श्री रोहिदास आघाव श्री सावंत भाऊसाहेब श्री विनोद ओतारी श्रीमती मनोरमा कंटाळी श्रीमती आशा काळे श्रीमती सुरेखा बनसोडे श्रीमती सविता घुले श्री नंदू तिडके श्री राहुल गाडेकर श्री सचिन दळवी श्री रोकडे भाऊसाहेब श्री वाजीद शेख श्री सुनील वाघ श्री मुरली शिरसाठ श्री मल्हारी दहिफळे श्री आबा डमरे श्री आकाश पवार श्री बद्री घोगरे श्री दिलीप मिसाळ श्री अमोल भवार श्री फुंदे भाऊसाहेब श्री सुरेंद्र बर्डे श्री गिरीश उगार उपस्थित होते
ग्रामपंचायत कराची थकबाकीदार असणाऱ्या लाभार्थ्यांना व केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजनांचे प्रथम द्वितीय हप्ता अनुदान घेऊनही बांधकाम वेळेत पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांना लोक अदालतीच्या नोटीसा ग्रामपंचायत ने दिल्या असून सर्व लाभार्थ्यांना आवाहन करण्यात येते की तात्काळ आपली थकबाकी ग्रामपंचायत कडे जमा करावी व घरकुले बांधकामे पूर्ण करून घेण्यात यावेत अन्यथा संबंधितावर पुढील कारवाई निश्चित केली जाईल याची नोंद घ्यावी.
श्री डॉक्टर जगदीश पालवे
प्रशासक तथा गटविकास अधिकारी पंचायत समिती पाथर्डी यांनी सांगितले.