शेवगाव चे वादग्रस्त पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांची तडकाफडकी बदली
By Admin
शेवगाव चे वादग्रस्त पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांची तडकाफडकी बदली शेवगाव पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक श्री. दिगंबर भदाणे यांची नियुक्ती काल रात्री स्वीकारला कारभार
शेवगाव- प्रतिनिधी
शेवगाव शहरात झालेली हिंदू मुस्लिम दंगल दंगलीचा सुदोष तपास एकतर्फी कारवाई काही ठराविक लोकांची ऐकून दोन्ही बाजू ऐकून न घेता गुन्हे दाखल करणे असे आरोप कायम त्यांच्यावर झाले होते अनेक वादग्रस्त घटना राजकीय कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविणे ज्यांच्या बदलीसाठी काहींनी देव पाण्यात ठेवले होते असे शेवगावचे वादग्रस्त पी. आय. विलास पुजारी त्यांच्या बदलीसाठी अनेक आंदोलने वरिष्ठांकडे तक्रारी झाल्या होत्या मध्यंतरी त्यांची बदली रद्द झाल्यावर शेवगाव शहरांमध्ये तुफान आतिषबाजी झाली होती विलास पुजारी यांची काल 1 डिसेंबर 2023 रोजी तडकाफडकी बदली करण्यात आली त्यांच्या जागी नाशिक जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले श्री दिगंबर भदाणे यांची नियुक्ती करण्यात आली शेवगाव शहरातील विविध सामाजिक संघटना राजकीय पक्ष यांनी नवनियुक्त पी.आय. दिगंबर भदाणे शेवगाव यांचे हारतुरे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी शेवगांव चे माजी सरपंच सतीश पाटील लांडे हमाल मापाडी चे अध्यक्ष एजाज भाई काजी माजी सरपंच राहुल मगरे माजी उपनगराध्यक्ष वजीर भाई पठाण कॉ. संजय नांगरे सामाजिक कार्यकर्ते अविनाश देशमुख मार्केट कमिटीचे संचालक जाकीर भाई कुरेशी व्यापारी फय्याज सौदागर माजी नगरसेवक कैलास तिजोरे लोकमतचे पत्रकार अनिल साठे आदी मान्यवर उपस्थित होते
भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष राज्य संघटक अरुण मुंडे आणि त्यांचे बंधू उद्योजक उदय मुंडे यांच्यावर पिंगेवाडी गावातील जप्त वाळू साठ्या प्रकरणी गुन्हे दाखल केल्याने अनेक राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांना कायद्याच्या कचाट्यात पकडल्याने अनेकांना दोन दोन तीन तीन महिने शेवगाव शहर सोडून फरार व्हावे लागले होते.यावेळी बोलताना नवनियुक्त पीआय साहेब यांनी शेवगाव शहरासह तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था तसेच सामाजिक सलोखा ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन दिले
पुजारी साहेबांची बदली झाल्यानंतर बस स्थानक क्रांती चौकात फटाके आणि तोफा वाजविण्यात आले शेवगाव शहरात बहुदा पहिली वेळा असावी एका अधिकाऱ्याच्या बदलीनंतर आणि बदली रद्द झाल्यानंतर फटाके वाजविण्यात आले
30932
10





