महाराष्ट्र
15403
10
गद्दारी करणाऱ्याला असा झटका देईन की १० पिढ्या विसरणार नाही
By Admin
गद्दारी करणाऱ्याला असा झटका देईन की १० पिढ्या विसरणार नाही; अजितदादांचा इशारा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या कार्यक्रमासाठी अजित पवार अहमदनगरमध्ये आले होते. या कार्यक्रमात बोलताना पवार यांनी जिल्हा बॅंकेत आघाडीला मतदान न करणाऱ्या संचालकांना इशारा दिला. गद्दारी करणाऱ्याला झटका दिल्याशिवाय राहणार नाही, असे अजित पवार म्हणाले. गद्दारी करणाऱ्या अवलादी आपल्याकडे नकोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी अजित पवार म्हणाले, एक गोष्ट अलिकडच्या काळात फार चुकीची घडली आहे. अहमदनगर जिल्हा बॅंकेची अध्यक्षपदाची निवडणूक, त्यामध्ये काय घडले कसे घडले सगळे मला माहिती आहे. कोणी त्यामध्ये शेण खाल्ले हे मला चांगले माहित आहे. गद्दारी करणाऱ्याला असा झटका देणार आहे की १० पिढ्या त्यांना पुढे आठवले पाहिजे, असा स्पष्ट इशारा अजित पवार यांनी दिला.
अरे जनाची नाही तरी मनाती ठेवायची, तिथे १४ संचालक हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आहेत. त्या ठिकाणी चंद्रशेखर घुले यांचा पराभव होतो. असली माणस नकोत आम्हाला, यांचे काय करायचे असेही पवार म्हणाले. अशी माणस आम्हला नको, आम्ही गरिबांकडे जाऊन हात जोडू ती गरीब माणस विश्वासाने आपल्या बरोबर राहतील, गरीब शब्दाला पक्की असतात, पण पद दिलेली मात्र, चुकीची वागतात, असा हल्लाबोल अजित पवार यांनी केला.
दरम्यान, जिल्हा बॅंक निवडणुकीत महाविकास आघाडीचे 14 संचालक होते. तर भाजपचे चार आणि त्यांना माननारे दोन असे एकून सहा संचालक भाजपकडे होते. महाविकास आघाडीचे उमेदवार घुले यांना 9 मते पडली. त्यामुळे आघाडीची चार मते फुटली. या मतांमुळे कर्डिले यांचा विजय झाला. त्यामुळे या फुटलेल्या संचालकांना अजित पवार यांनी या संचालकांना इशारा दिला.
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांची निवड झाली. बँकेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) अर्ज दाखल केला होता.
बहुमत असूनही त्यांचा एका मताने पराभव झाला. त्यामुळे हा पराभव विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे
Tags :
15403
10





