महाराष्ट्र
30849
10
दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर मार्ग निघतो -डॉ. अरुण अडसूळ
By Admin
दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर मार्ग निघतो -डॉ. अरुण अडसूळ
गुणवंत विद्यार्थी शिक्षक यांचा सत्कार
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील
दादा पाटील राजळे कला व विज्ञान वाणिज्य महाविद्यालय आदिनाथनगर येथे स्व. दादापाटील राजळे यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी मा. कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे , अध्यक्ष , भारतीय शिक्षण संस्था पुणे , मा. प्राचार्य डॉ. अरुण अडसूळ मा. सदस्य महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी मुलांना मार्गदर्शन करताना , "करिअरच्या वाटा निवडताना " या विषयावर मार्गदर्शन केले. दुर्दम्य इच्छाशक्ती असणे आवश्यक्य आहे. जिगर , जिद्द व जोश कायम ठेवला पाहिजे. संधी कोणालाही सहज मिळत नाही ती खेचून आणावी लागते. आयुष्य जगताना कोणाशीही तुलना करू नका. वेळेचे व्यवस्थापन करा. त्याचबरोबर आपल्या जगण्यात नम्रता असली पाहिजे. आयुष्य फार कमी आहे. अडचणींवर मात करण्यासाठी वाचन महत्त्वाचे आहे. वाचनाने मार्ग निघतो. त्यासाठी स्वतःला आतून पेटतं ठेवलं पाहिजे. असे त्यांनी वेगवेगळी उदाहरणे देऊन ओघवत्या शैलीमध्ये विद्यार्थ्यांना मत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमात स्व . सौ. चंद्रभागाबाई दादापाटील राजळे सर्व सेवाभावी संस्था , आदिनाथनगर यांच्यावतीने पाथर्डी तालुक्यातील इयत्ता दहावी , बारावी , कृषी पदविका , कला , वाणिज्य व विज्ञान , संगणक पदवी पदवीधर , पदव्युत्तर परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी तसेच गुणवंत शिक्षकांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता . सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मा. शिवाजीराव राजळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना "नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थी व शिक्षकांनी आपली भूमिका योग्य प्रकारे पार पाडावी" असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व श्री वृद्धेश्वर स. सा. कारखान्याचे चेअरमन मा.आप्पासाहेब राजळे (काका) यांनी भूषवले या कार्यक्रमासाठी अँड . गुलाबराव राजळे , रामकिसन काकडे आबा , श्रीकांत मिसाळ , शेषराव ढाकणे , विक्रमराव राजळे , बाबासाहेब किलबीले , साहेबराव सातपुते ,जे. आर. पवार साहेब , आर. जे.महाजन साहेब , भास्करराव गोरे साहेब ,
शामसुंदर राजळे , दत्तात्रय देशमुख , साखरेसर . अरुण भोर , शामराव गरड , वसंतराव भगत आणि परिसरातील विशेष नैपुण्यप्राप्त शिक्षक , विद्यार्थी , पालक व ग्रामस्थ परिसरातील हायस्कुलचे मुख्याध्याक , शिक्षक, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
क्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात शिक्षण संस्थेचा व व्याख्यानमालेचा गेल्या आठरा वर्षांचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.निर्मला काकडे व प्रा.राजेंद्र इंगळे यांनी केले तर आभार प्रा . अशोक काळे यांनी मानले . ही व्याख्यामला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
Tags :
30849
10





