गरजवंताचे प्राण वाचवण्यासाठी योगदान द्यायला हवे- माधव बाबा
सुवर्णयुग परिवार ट्रस्टच्या वतीने रक्तदान शिबिर
पाथर्डी प्रतिनिधी:
आपल्या देहातील रक्ताचे कुठल्याही प्रकारचे मूल्य परमेश्वर मागत नाही.यामुळे आपण देखील रुग्णांसाठी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून विनामूल्य व उत्स्फूर्तपणे वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत रक्तदान करून गरजवंतांचे प्राण वाचवण्यासाठी योगदान द्यायला हवे,असे प्रतिपादन शंकर महाराज मठाचे प्रमुख माधव बाबा यांनी केले.
शहरातील नवी पेठ येथील सुवर्णयुग परिवार ट्रस्ट व जनकल्याण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी माधव बाबा बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अँड.प्रताप ढाकणे,मंडळाचे अध्यक्ष संजय दराडे,युवा परिवाराचे अध्यक्ष लक्ष्मण पावटेकर,बाळासाहेब जिरेरसाळ,संतोष भागवत, सुनिल गुगळे,डॉ.विलास बाहेती,हेमंत मंत्री,वैभव चिंतामणी,महेश बाहेती,जनकल्यांचे गुलशन गुप्ता व स्मिता बडवे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
शहरातील कसबा विभागामधील चिंतामणी गणपती मंदिर येथे ह.भ.प.गोविंद महाराज जाटदेवळेकर यांचे प्रवचन झाले.पावन गणपती प्रतिष्ठान,जय भवानी व गणेश पेठ तरुण मंडळासह विविध गणेश मंदिरामध्ये दुग्धाभिषेक,भजन,कीर्तन प्रवचन,भारुड यासह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.पहाटेपासून तर रात्री उशिरापर्यंत गणेश मंदिरांमध्ये कार्यक्रमांची रेलचेल होती.याचा लाभ शहर परिसरातील भाविकांनी घेतला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी
मोहटा देवस्थानचे विश्वस्त डॉ.श्रीधर देशमुख,आजिनाथ डोमकावळे,राजेंद्र कोटकर,सोमनाथ रोडी आदींनी विशेष परिश्रम घेतले.