शेवगाव तालुक्यातील हसनापूर ग्रामपंचायत च्या विदयमान सरपंच शोभा ढाकणे यांच्या विरोधात बहुमताने अविश्वास ठराव मंजूर
शेवगाव- प्रतिनिधी
याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील हसनापूर ग्रामपंचायत च्या विद्यमान सरपंच सौ शोभा नवनाथ ढाकणे यांच्या विरोधात शेवगावचे तहसीलदार यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता त्यावर तहसीलदार शेवगाव यांनी काल 28 नोव्हेंबर रोजी विशेष सभेचे आयोजन करून अविश्वास ठरावावर मतदान घेतले त्यात विद्यमान उपसरपंच गणेश ढाकणे यांच्यासह अंकुश ढाकणे काकासाहेब ढाकणे पुष्पा ढाकणे सुनिता ढाकणे सविता खंडागळे व उषा ढाकणे यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने सात विरुद्ध दोन अशा बहुमताने अविश्वास ठराव मंजूर झाला यावेळी शेवगाव पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता गावामध्ये तणावपूर्ण शांतता होती कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही विद्यमान सरपंच ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत नाहीत मनमानी कारभार करतात त्यामुळे गाव विकासापासून दूर राहिला होता यामुळे अविश्वास ठराव आणून तो बहुमताने पारित करून घेतला.
हसनापुर चे सध्याचे उपसरपंच व पुण्याचे प्रसिद्ध उद्योगपती श्री गणेश आर. ढाकणे यांची भावी सरपंच म्हणून निवड होण्याची दाट शक्यता आहे