शेकटे बु. ग्रामपंचायतचा मनमानी कारभार सुरू
शेवगाव- प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील शेकटे बु. ग्रामपंचायत येथे आजतागायत ४-५ शासकीय कर्मचारी कार्यरत आहेत पण ते सर्व वशिल्याने भरती केलेले ओपन प्रवर्गातील आहेत. आजपर्यंत एकही अनु.जातीचा कर्मचारी भरती केलेला नाही. गेल्या ३-४ महिन्यापासुन ग्रा. पं शिपाई पदाची जागा रिक्त झालेली आहे.आता ही रिक्त जागा अनुसुचित जातीसाठी सोडण्यात यावी. ही भरती संपूर्णपणे कायदेशीर रित्या व शासकीय नियमांचे पालन करूनच करण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन आज वंचित बहुजन आघाडीच्या शेकटे बु|| येथील कार्यकर्त्यांकडून BDO साहेबाला देण्यात आले. ही भरती प्रक्रिया वशिल्याने व वेळेवर झाली नाही तर वंचित बहुजन आघाडीचे राज्य.उपाध्यक्ष मा. प्रा.किसन चव्हाण सर यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती समोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल अशी सूचनाही BDO साहेबांना देण्यात आली. BDO साहेबांनी लगेच ग्रामपंचायतला आदेश देतो असे आश्वासन दिलेले आहे.