जुन्यापेन्शन साठी शिक्षक व प्राध्यापकांचा 12 डिसेंबरला महामोर्चा
By Admin
जुन्या पेन्शन साठी शिक्षक व प्राध्यापकांचा 12 डिसेंबरला महामोर्चा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
महाविद्यालय प्राध्यापक व शिक्षकांचा पेन्शनसाठी १२ डिसेंबर रोजी ‘पेन्शन जनक्रांती महामोर्चा’ हजारो प्राध्यापक सहभागी होणार आहे . माहिती अशी माहिती पेन्शन कृती समितीचे अध्यक्ष डॉ. मारुती तेगमपुरे यांनी दिली.
जुन्या पेन्शन च्या मागणीसाठी १२ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशन कालावधीत १० लाख कर्मचाऱ्यांचा यशवंत स्टेडियम ते विधान भवन असा ‘पेन्शन जनक्रांती महामोर्चा’ आयोजित करण्यात आला असून यामध्ये राज्यातील कर्मचारी नवीन पेंन्शन योजनेला विरोध दर्शवत सरकारकडे जुनी पेन्शनची मागणी लावून धरणार आहेत. अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्राध्यापक जुनी पेंन्शन हक्क कृती समितीचे राज्य समन्वयक तथा प्राध्यापक संघटनेचे कार्यकारिणी सदस्य प्रा डॉ. सोमनाथ वाघमारे यांनी दिली. मागील १८ वर्षातील न पेन्शन योजनेचे योजनेचे फसवे स्वरूप लक्षात घेऊन १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी अशी मागणी राज्यातील १७ लाख कर्मचाऱ्यांच्या वतीने सा
तत्याने विविध आंदोलने, मोर्चे, उपोषणे, संप आदि माध्यमातून केली जात आहे. या वर्षी १४ ते २० मार्च २०२३ या कालावधीत राज्यातील १७ लाख कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शनच्या मागणीसाठी बेमुदत संप देखील केला होता.
संपाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून माजी सनदी अधिकारी सुधीर श्रीवास्तव, के. पी. बक्षी व सुबोध कुमार अशी त्रिसदस्यीय समिती केली होती. या समितीने राष्ट्रीय निवृतीवेतन प्रणाली (NPS) व जुनी पेन्शन यांचा तुलनात्मक अभ्यास करून या योजनेतील कर्मचाऱ्यांना सेवानिवृतीनंतर खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना बाबतची शिफारशी करणारा अहवाल तीन महिन्यात सादर करावा असे ठरले होते. या समितीने नुकताच आपला अहवाल शासनास सादर केला आहे. समितीच्या अहवालात जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या दृष्टीने नेमक्या कोणत्या शिफारशी करण्यात आल्या आहेत याकडे देखील राज्यातील १७ लाख कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. या समितीकडून जुनी पेंशन व्यतिरिक्त दूसरा पर्याय राज्यातील लाखों कर्मचाऱ्याना अमान्य आहे, तसेच जुनी पेंशन ला बगल दिल्यास आगामी निवडणुकामध्ये कर्मचारी च्या माध्यमातून आपली ताकत दाखविणार आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य प्राध्यापक जुनी पेन्शन हक्क कृती समिती च्या वतीने महाराष्ट्रातील वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने ‘पेन्शन जनक्रांती महामोर्चा’ मध्ये सक्रीयपणे सहभागी होऊन जुनी पेन्शनचा लढा अधिक बळकट करावे असे आवाहन कृती समितीचे अध्यक्ष प्रा डॉ मारोती तेगमपुरे, सचिव प्रा डॉ अमोल लाटे, प्रा डॉ अमोल काटेगावकर प्रा डॉ. ललितकुमार शनवारे, प्रा डॉ. शैलेश वाघ, प्रा. डॉ रमेश बहादूरे, प्रा डॉ. शिवाजी भोसले, डॉ संतोष बाबर, प्रा डॉ सचिन कदम, प्रा डॉ मनोज गिराम, प्रा डॉ नितीन पडवळ प्रा डॉ अरविंद पाटील व कृती समितीच्या सर्व सभासदांच्या वतीने करण्यात येत आहे.
14735
10





