बाळासाहेब कोठुळे यांची राज्य संपर्कप्रमुख पदी निवड
पाथर्डी प्रतिनिधी-
पाथर्डी तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार व कवी बाळासाहेब कोठुळे यांची द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या राज्य संपर्कप्रमुख पदी नुकतीच निवड झाली आहे तसे निवडीचे पत्र संघटनेचे अध्यक्ष अन्सार शेख यांच्याकडून त्यांना प्राप्त झाले आहे
पत्रकारिता क्षेत्रात बाळासाहेब कोठुळे अनेक वर्षापासून सातत्यपूर्ण काम करत आहेत जिल्ह्यातील दैनिक पुढारी दैनिक सार्वमत दैनिक प्रभात दैनिक गावकरी दैनिक साहित्य सेवा दैनिक माझा मराठवाडा दैनिक साहित्य तेज दैनिक जनहित मराठी इत्यादी वर्तमानपत्रामधून त्यांनी लिखाण करून वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याचे काम आपल्या लेखणीच्या माध्यमातून केली आहे साहित्य क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान असून कथा कविता राजकीय विडंबन वात्रटिका या लिखाणाबरोबरच तालुकास्तरीय कवी संमेलनापासून तर आंतरराष्ट्रीय काव्य संमेलनापर्यंत त्यांचा साहित्यिक प्रवास असून त्यांना राज्यस्तरीय साठ पुरस्कार प्राप्त झाले आहेत त्यामुळे संघटनेचे अध्यक्ष अन्सार शेख यांनी त्यांना राज्य कार्यकारणीवर कामाची संधी उपलब्ध करून दिली आहे त्यांच्या या निवडीबद्दल लोकमतचे पत्रकार चंद्रकांत गायकवाड दिव्य मराठीचे पत्रकार अविनाश मंत्री दैनिक पुण्यनगरी चे पत्रकार अमोल राजे म्हस्के दैनिक सार्वमत पत्रकार नारायण पालवे सकाळचे पत्रकार तुळशीदास मुखेकर पुण्यनगरीचे ज्येष्ठ पत्रकार विलास तात्या मुखेकर सुनील नजन वजीर शेख जलभूमीचे आदिनाथ दिंडे यांनी त्यांचे अभिनंदन केले