पाथर्डी - जमिनीच्या वादातून तलवारीने हल्ला ; एकजण गंभीर जखमी
नगर सिटीझन टिम प्रतिनिधी
पाथर्डी -
आपल्या बाजूची जमीन दुसर्यांनी विकत घेतली, म्हणून डोक्यात तलवारीने वार केल्याने मारुती लक्ष्मण दहिफळे (वय 45( रा मोहटा ता पाथर्डी) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना नगरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
याबाबद मारुती दहिफळे यांनी दिलेल्या जबाबावरून मारहाण करणारे गणेश पोपट दहिफळे,शिवाजी पोपट दहिफळे, पोपट हरीे दहिफळे, जालिंदर हरी दहिफळे, सिंधूबाई हरी दहिफळे व संगीता पोपट दहिफळे (सर्व रा. मोहटा, ता. पाथर्डी) यांच्या विरोधात मंगळवारी पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मोहटादेवीगड येथे मारुती दहिफळे यांचे स्टेशनरी दुकान आहे.
येथेच पोपट हरी दहिफळे यांचेा नारळ प्रसादाचे दुकान असून त्यांची पत्नी संगीता, मुलगा गणेश व शिवाजी असे सदरची दुकान चालवतात. लक्ष्मण दहिफळे यांनी मारहाण करणार्या कुटुंबाच्या शेजारी जमिन विकत घेतल्याने पोपट हरी दहिफळे व इतरांना नवीन घेतलेल्या जागेवर लक्ष्मण दहिफळे हे शेडचे काम करत असताना गणेश दहिफळे, शिवाजी दहिफळे, पोपट दहिफळे, जालिंदर दहिफळे ,सिंधूबाई दहिफळे व संगीता दहिफळे सर्वजण लक्ष्मण दहिफळे यांना शिवीगाळ करु लागले. तू येथे जागा का घेतली? तू लगेगच शेडचे काम करायला लागला. तुला येथे काहीही करू देणार नाहीत.
काही केल्यास जीवे मारण्याची धमकी धमकी दिली. त्यावेळी लक्ष्मण दहिफळे यांनी पैसे देऊन जमीन खेरदी केली आहे. हे सांगत असताना आरोपींन तलवार,लाकडी दांडे व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गभीर दुखापत केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.