MPSC पूर्वपरीक्षा पुन्हा लांबणीवर; १४ मार्च रोजीला होणारी परीक्षा रद्द
नगर सिटीझन- प्रतिनिधी
राज्यसेवा पूर्व परीक्षा पुन्हा एकदा लांबणीवर टाकण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सदर निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे १४ मार्च रोजी पूर्वनियोजित असलेली राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
प्रस्तुत परीक्षेचा सुधारित दिनांक यथावकाश जाहीर करण्यात येईल असे आयोगाने म्हटले आहे.