महाराष्ट्र
1171
10
प्रत्येकाच्या मनात रुजणारे व्यक्तिमत्व म्हणजे गोकुळ भाऊ दौंड
By Admin
प्रत्येकाच्या मनात रुजणारे व्यक्तिमत्व म्हणजे गोकुळ भाऊ दौंड
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील सर्व मित्र परीवारासाठी आजचा दिवस आनंदाचा आहे, कारण की सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय गोकुळ भाऊ दौंड यांचा आज वाढदिवस आहे. मी संजीवनी फाउंडेशन अहमदनगर जिल्हा अध्यक्ष व्याख्याते गोकुळ आंधळे स्वतः वाढदिवसा निमित्ताने माझं मनोगत व्यक्त करतो.
मातीच्या रंगाचं आणि मातीच्या गंधाचं काळीज घेऊन जन्मलेल्या प्रत्येक माणसाला या मातीच्या उद्धारासाठी आयुष्याचं रणांगण करतांना सार्थकतेचा आनंद होतो, कारण ही माणसं आकाशात उंच उडत असतांना या मातीच्या स्पर्शाला कधी विसरत नाही. ही माणसं सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आली असली, तरी त्यांचे कार्य असामान्य कुटुंबा पर्यंत पोहोचत आहे. ही माणसं कधी रडत नाही आणि कधी घेतलेला वसा टाकत नाही. आणि असंच असामान्य व्यक्तिमत्त्व पाथर्डी- शेवगाव तालुक्यामध्ये भिनलेलं आणि तसेच तुमच्या आणि आमच्या मनात रुजलेले व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय गोकुळ भाऊ दौंड. मी शब्दांची पूजा करत नाही. मी माणसासाठी आरती गातो. त्यांच्या गावात सूर्य नाही. त्यांच्या हातात उजेड देतो, हा मुख्य उद्देश त्यांच्या कार्यातून दिसतो. आणि या पाथर्डी तालुक्या मध्ये विकास करण्याचे कार्य हाती घेतलेले आहे. ज्यांनी ज्यांच्या समस्यावर पाऊल उचलले असेल ते म्हणजे दैवत गोपीनाथ मुंडे साहेब होय. जोपर्यंत असतील चंद्र सूर्य तारे, तोपर्यंत भाऊ वाहतील तुमच्या कर्तुत्व ज्ञानाचे वारे. तुमचं चालनं किती युगाचं बोलणं. तुम्ही सभापती झाले, तुम्ही हजारो पाखरांना एकत्र केलं, म्हणून वट वृक्षाची फांदी झालात. एवढेच नाही आता आज आमच्या गोकुळ भाऊ दौंड मित्र परिवारामध्ये कोणता सदस्य कधीच सोडून जाणार नाही. मी एक सांगू इच्छितो, पंखांना अनुभवाचे बळ मिळालं, एक सुंदर कलाकृती तयार होते तसेच तुमच्या आणि आमच्या जीवनातील एक सुंदर कलाकृती म्हणजे गोकुळ भाऊ दौड. गोकुळ भाऊ दौंड यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. गोकुळ भाऊ दौंड यांच्या वाढदिवसानिमित्त एक संदेश सांगू इच्छितो, आता आपण पाहतोच की भारत देशा वरती नाही, तर संपूर्ण जगावरती कोरोना विषाणूंनी थैमान घातलेले आहे. त्यामुळे आपण विनाकारण घराच्या बाहेर पडू नका. काम असेल तर घराबाहेर पडा. काम नसेल तर घरातच सुरक्षित रहा. आपण आपली पण काळजी घ्या. आपल्या परिवाराची पण काळजी घ्या आणि आपण लॉकडाऊन चे नियम पाळले, तर नक्कीच आपण कोरोना विषाणूला हरवू आणि आपला भारत देश नक्की जिंकेल. एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
गोकुळ आंधळे
अध्यक्ष
संजीवनी फाउंडेशन अहमदनगर
व्याख्याते
जिल्हा समाज भूषण पुरस्कार विजेते
Tags :

