कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या २७ गायीं श्रीकृष्ण गोमाता शाळेत दाखल
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील श्रीकृष्ण गोमाता शाळेत पोलिसांनी
अवैधरित्या कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या २७ लहान-मोठ्या गायी व वासरे दाखल केली. पोलिसांनी चांदा येथे केलेल्या कारवाईत गोवंशीय जनावरांसहित दोन वाहने जप्त करण्यात आली. त्याची एकूण किंमत १८ लाख ८३ हजार रुपये आहे. यासंदर्भात ३ जणांना अटक ३ करण्यात आली, तर दोघे जण फरार झाले.
या गुन्ह्यात अजहर ताहीर शेख (चांदा, नेवासा), जुलैद अब्बास शेख (औरंगाबाद) व भगवान विष्णू धुमाळ (चांदा) या तिघांना अटक करण्यात आली, तर इर्शाद कादिर शेख व शनी पठाण हे दोघे पसार झाले. या पाच जणांविरुद्ध सोनई पोलिस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागणूक दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अटक केलेल्या तिघांविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल झालेले आहेत. ताब्यात घेतलेल्या २७ गायींची व गोऱ्ह्यांची देखभाल व संवर्धनासाठी जय गोमाता सेवाभावी संस्था येथे रवानगी करण्यात आली आहे.यावेळी गायी घेऊन जबाबदारी स्विकारत स्वतः सहाय्यक पोलिस निरीक्षक आर.टी.कर्पै, ज्ञानेश्वर थोरात,हवालदार गायकवाड, दत्ता गावडे, अडकित्ते,बाबा वाघमोडे,नाना तुपे श्री कृष्ण गो माता शाळेचे संस्थापक दिपक महाराज काळे यांची भेट घेवून गायी व वासरे यांची सेवा करुन त्यांची जबाबदारी घ्या असे सांगितले.