पाथर्डी- खेर्डै येथील खुनाची चौकशी करा. यांनी केली मागणी
पाथर्डी - प्रतिनिधी
खेर्डे गावातील यात्रेमध्ये एका युवकाचा खून झालेल्या घटनेबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड यांनी केली आहे .याबाबत आव्हाड यांनी पाथर्डीचे पोलिस निरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. मागील आठवड्यात तालुक्यातील खेर्डे गावातील राजेंद्र जेधे (वय ३०) या युवकाची हत्या पूर्वीच्या वादातून करण्यात आल्याची फिर्याद मयताच्या चुलत्याने पाथर्डी पोलिसात दिली