महाराष्ट्र
1763
10
गरोदरपणात न घाबरता कोरोना लस घ्या. राजश्री घुले
By Admin
गरोदरपणात न घाबरता कोरोना लस घ्या. राजश्री घुले
बोधेगाव ग्रामीण रुग्णालयात गरोदर मातांचे कोरोना लसीकरण संपन्न.
............................................................
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगांव ग्रामीण रुग्णालयात घेण्यात आलेल्या गरोदर माता लसीकरणा मध्ये तालुक्याच्या पुर्व भागातील गरोदर महिलाना जाणे - येणे शक्य नसल्याने आणि त्यांनी केलेल्या मागणीनुसार बोधेगाव ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाचा कॅंप घेण्यात आला. या लसीकरणात "गरोदर मातानी, मी गरोदर आहे, आता मी कशी लस घेउ" असा विचार न करता "आपले कुटुंब, आपली जबाबदारी" आंतर्गत न घाबरता कोरोनाच्या लसिकरणात पुढे येण्याचे अवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्रीताई घुले यांनी बोधेगाव याठिकाणी गरोदरमाता लसीकरणाच्या भेटी दरम्यान केले.
कोरोनाचा वाढता कहर पहाता लसीकरणाची वयोमर्यादा कमी करत शासनाने १८ वर्षापर्यतच्या नागरिकांचा समावेश कोरोना लसीकरणामध्ये केला. परंतु गरोदर मातांचे लसीकरण नियमांच्या अटीमध्ये गुरफटून गेले होते. परंतु त्यांचे आरोग्यही ईतरांप्रमाणे महत्वाचे असल्याकारणाने यासंदर्भातील मागणी आणि पाठपुरावा आरोग्य विभागाकडे करण्यात आला होता. दरम्यान या मागणीचा विचार करत शेवगांव ग्रामीण रुग्णालयात गरोदर मातांचे लसीकरणाचा कॅंप घेण्यात आला परंतु शेवगाव पासून बोधेगाव सह परिसरातील गरोदर महिलांना २५ ते ३० किमी चे अंतर कापणे या परिस्थितीत शक्य नसल्याने बोधेगाव ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण कल्याण समितीचे पंचायत समिती सभापती प्रतीनिधी सचिन घोरतळे यांनी आरोग्य विभागाला बोधेगाव याठिकाणी कॅंप घेण्या संदर्भात डॉ क्षितिज भैय्या घुले यांच्या मार्गदर्शना खाली पाठपुरावा केला. दरम्यान केलेल्या मागणीचा विचार करत बोधेगाव ग्रामीण रुग्णालयात १६ ऑगस्ट रोजी गरोदर मातांचे लसीकरण घेण्यात आले. यामध्ये २० महिलानी सहभाग नोंदवला. दरम्यान कॅंप सुरु असताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्रीताई घुले यांनी भेट दिली. भेटी दरम्यान त्यांनी गरोदर महिलाना आवाहन केले आहे कि, गरोदर मातानी लस घेणे सुरक्षित आहे. आपले कुटुंब आपली जबाबदारी आंतर्गत यामध्ये ईतर नागरिकाबरोबर गरोदर महिलानी देखील सहभागी होणे आवश्यक आहे कारण कोरोनाची तिसरी लाट ही पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा दिड पटीने अधिक प्रभावी असणार आहे. कोरोनाच्या या काळात डॉक्टरानी मदतीचा हात पुढे करत महत्वाची भुमिका बजावली आहे यावेळी कौतुक करावे तेवढे कमीच आहे. यावेळी
जि प अध्यक्षा राजश्रीताई घुले सह पंचायत समिती सभापती डॉ क्षितिज भैय्या घुले, जि प सदस्य संगिताताई दुसंगे, राष्ट्रवादी किसान सेलचे शेवगांव तालुका आध्यक्ष ज्ञानदेव घोरतळे, सरपंच रामजी आंधारे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शेवगांव तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब ढाकणे, डॉ क्षितिज घुले युवा मंचचे संतोष पावसे, अनिल घोरतळे, मोहित पारनेरे, सिद्धांत घोरतळे, मिलिंद गायकवाड, अर्जुन दराडे बोधेगाव ग्रामीणचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. दिपक परदेशी, डॉ. अरुण भिसे, डॉ.शुभम काटे, डॉं. रविना सांगळे. सह वैद्यकीय कंर्मचारी स्टाफ हजर होता.
Tags :

