पाथर्डी तालुक्यातील 'या' प्राथमिक आरोग्य केंद्राकडून 3 हजार लसीचे डोस उपलब्ध
By Admin
पाथर्डी तालुक्यातील 'या' प्राथमिक आरोग्य केंद्राकडून 3 हजार लसीचे डोस उपलब्ध
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - शुक्रवार 07 मे 2021
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रावर 3 हजार लसीचे डोस प्राप्त झाले असून नागरिकांनी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन लसीकरण करुन घ्यावे.असे तिसगाव प्राथमिक आरोग्य अधिकारी यांनी सांगितले आहे.
जिल्हासह तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रावर डाॕक्टर व सर्व कर्मचाऱ्यांनी आरोग्य केंदावर मोठ्या प्रमाणात लसीकरण व्हावे.या चांगल्या हेतूने प्राथमिक आरोग्य केंद्रावर सातत्याने काम होताना दिसत आहे.
त्यामुळे तालुक्यात सर्वाधिक लस देण्याचे काम तिसगाव आरोग्य केंद्राकडून झाले आहे.
तालुका आरोग्य अधिकारी भगवान दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरण सुरू असून जिल्हा पातळीवरुन लसीचा पुरवठा तालुक्याला होत आहे.
त्या पद्धतीने तालुक्यात आरोग्य विभागाची संपुर्ण टिम काम करत आहे.तीसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रावर सुरवातीपासूनच लस घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा आहेत.लोकांच्या गर्दीमुळे कोरोनाचा धोका होवू नये म्हणून तिसगाव येथील माजी सैनिक पद्माकर पाथरे हे या प्राथमिक आरोग्य केंद्रावर पहारा देत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत येथे येणाऱ्या लोकांना कोरोनापासून सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.तसेच त्यांची येथे येणाऱ्या लोकांना समजून सांगण्याची पद्धत आणि ज्येष्ठ नागरीकांच्या आरोग्याबद्दल काळजी घेण्यासाठी त्यांची असणारी धडपड निश्चित चांगली आहे.
कोरोनाच्या महामारीत देखील स्वतःची जबाबदारी समजून या ठिकाणी लोकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असून ते सुद्धा मोफत सेवा नागरिकांना देत आहेत.
या केंद्रातील डाॕ.बाबासाहेब होडाशीळ, डाॕ.अर्चना लांडे, आरोग्य सेविका शारदा वाकचौरे,सुवर्णा वांढेकर , सुरय्या पठाण,बी.ए.शेख , कनिष्ठ आरोग्य अधिकारी संदिप अकोलकर, धर्मनाथ पालवे ,संभाजी चौधर , संजय बळीद,तेजस फलके,पी.एस.रावत, मतीन शेख ही संपुर्ण टिम या ठिकाणी जास्तीत जास्त नागरीकांचे लसीकरण करण्यासाठी प्रयत्नशील असल्यानेच तीसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आत्तापर्यत सर्वाधिक लसीचे डोस झाले आहेत.

