'या' तालुक्यातील कोविड सेंटरमध्ये ८० वर्षाच्या आजोबांचा झिंगाट डान्स
By Admin
'या' तालुक्यातील कोविड सेंटरमध्ये ८० वर्षाच्या आजोबांचा झिंगाट डान्स
जामखेड तालुक्यातील आरोळे हॉस्पिटलमधील कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांना मन प्रसन्न करण्यासाठी उपक्रम
नगर सिटिझन live टिम प्रतिनिधी - १८ मे ,२०२१, मंगळवार
जामखेड : आरोळे हॉस्पिटलमधील कोविड सेंटरमध्ये झिंगाट गाण्यावर ८० वर्षाच्या आजोबांनी भन्नाट डान्स केला. त्यांचा हा डान्स पाहून इतरांही डान्स करण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे कोविड सेंटरमध्ये एक चैतन्यमय वातावरण निर्माण झाले.
कोरोना महामारीमुळे श्रीमंतापासून ते गरीब प्रत्येक जण भितीच्या सावटाखाली आहेत. अनेक रुग्णालयांनी तर माणुसकीला काळिमा फासला आहे. अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी तर रुग्णालय प्रशासनावर गुन्हे दाखल केले आहेत. पण आरोळे हॉस्पिटल याला अपवाद आहे. रुग्णांच्या चेहर्यावरील कंटाळा, भिती गेली पाहिजे, याकडेही या हॉस्पिटलमध्ये लक्ष दिले जाते.
याच भावनेतून आरोळे हॉस्पिटलमधील समन्वयक सुलताना शेख यांनी सर्व रुग्णांना झिंगाट गाण्यावर डान्स करण्यास लावले, आणि चक्क ८० वर्षाच्या आजोबांनी देखील या गाण्यावर ठेका धरला. त्यामुळे सेंटरमधील सर्वच वातावरण बदलून गेले. रुग्णांच्या मनातील भीती देखील पळुन गेली.
जामखेड येथील आरोळे हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षातील रूग्णांच्या चेहर्यावरील कंटाळा घालविण्यासाठी येथील समन्वयक सुलताना शेख यांनी रूग्णांना झिंगाट गाण्यावर डान्स करण्यास लावला. या डान्सचा एक व्हिडिओ शेअर करीत 'मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण...' अशा भावनाच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.
आरोळे हॉस्पिटलमधील डान्सची चांगली चर्चा सध्या रंगू लागली आहे. सोशल मीडियात डान्स करतानाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या 'म्युझिक थेरपी'चे आमदार रोहित पवार यांनीही कौतुक केले आहे. रोहित पवार यांनी एक डान्स व्हिडिओ आपल्या ट्विटरवर शेअर केला असून आरोळे हॉस्पिटलच्या उपक्रमाचे कौतुक केले आहे. पवार म्हणतात, 'मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण...' या उक्तीनुसार आरोळे हॉस्पिटलच्या समन्वयक सुलताना शेख यांनी कोविड सेंटरमध्ये रुग्णांसाठी 'म्युझिक थेरपी'चा यशस्वी वापर केला आणि काही क्षण आजारपण विसरून अनेक रुग्णांची पावलंही झिंगाट गाण्यावर अशी थिरकली!'

