लसीकरणासाठी 18 ते 44 वयातील व्यक्ती आॕनलाईन नोंदणीसाठी झालेत बेजार, प्रशासनही हतबल,तर राजकीय लोकांचे दुर्लक्ष बेजार,
By Admin
लसीकरणसाठी
18 ते 44 वयातील व्यक्ति ऑनलाइन नोंदणी साठी झालेत बेजार,
प्रशासन ही हतबल, तर राजकीय लोकांचेही दुर्लक्ष
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 10 मे 2021 सोमवार
कोरोनाच्या काळात नागरिकांना आशेचा किरण ठरू पाहणाऱ्या लसीचे गौडबंडाळ, ज्यां जेष्ठ नागरिकांनी विश्वासाने पहिली लस घेतली आहे त्यांना दुसरी न मिळणे, 18 ते 44 च्या व्यक्तींना लसीसाठी तासन तास मोबाइल कडे पाहत बसावे लागणे, यावर उपाय तालुका स्तरिय अधिकाऱ्याना काहीच माहिती न देता येणे व या सर्व प्रकारात ज्याचे कडे मोठ्या आधाराने पाहिले तर जाते त्या राजकीय नेत्यांनी तेरी भी चूप मेरी भी चूप याचा अवलंब करत जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे यामुळे सर्व सामान्य नागरिक पुरता हैराण झाला असून प्रशासनाने योग्य पद्धतीने लोकांना माहिती द्यावी, आहे की त्या वेळी व्यवस्थेत सुधारणा करावी अन्यथा लोकांच्या सहन शक्तीचा उद्रेक झाल्याशिवाय या राहनार नाही हे लक्षात घेण्याची गरज आहे.
कोरोना मुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे, सर्व व्यवहार बंद असताना ज्याची चलती आहे त्याचे अनेक बाबी डोळ्या देखत सुरू आहेत, अनेक लोक रस्त्यावर बिन दिक्कत फिरत आहेत, सर्व सामन्यांना मात्र दंड होत आहे यातुन कोरोनाचा धुमाकुळ सुरू आहे, तालुक्यात व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध नाही, कोरोना तपासणीसाठी आवश्यक स्कोर तपासणीची एच आर टी सी ची सुविधा नाही, कोरोना झालेल्या लोकांना बेड मिळत नाही, रेमसीडीयर मिळत नाही ऑक्सिजन मिळत नाही ही चर्चा होत असताना व कोरोनाचा आकडा कमी होताना दिसत नसताना लसीकरण महत्वाचे वाटू लागल्याने अनेकांचा लस मिळविण्यासाठी आटापिटा सुरू झाला मात्र लसीकरनात ही मोठा गोंधळ सुरू झाला आहे, 45 च्या वरती वय असलेल्या काही लोकांनी पहिली लस घेतली असली तरी त्यांना दुसरी लस गेली काही दिवसापासून मिळायला तयार नाही, तर अनेक जेष्ठ नागरिक अजून ही लसीच्या पहिल्या डोसची चातका सारखी वाट पाहत आहेत. मात्र ती मिळायला तयार करण्यात नाही याबाबत प्रशासन ज्याला म्हटलं जातं ते कोणीच काहीच माहिती स्वतः हुन द्यायला तयार करण्यात नाहीत. लोकां साठी पत्रकारांना या अधिकार्या च्या मागे लागून माहिती मिळवावी लागत आहे.
जेष्ठ नागरिकांची लसीकरणाबाबत वाईट अवस्था असताना 18 ते 44 च्या लोकांचे लसीकरण शासनाने सुरू केले आहे त्यामध्ये ही मोठा गोंधळ सुरू असून दिवसात अवघ्या 200 लोकांचे बुकिंग होणे बुकिंग ची सुविधा अत्यंत अवेळी व मनमानी पद्धतीने सुरू होणे यासाठी लोकांना तासन तास मोबाईल कडे पाहत बसावे लागत आहे, यातही कुठलेही नावे बुक होणे एकाच यादित डबल नावे बुक होणे, अचानक यादीच रद्द करणे अशा अनेक कारणांमुळे किचकट बुकिंग व्यवस्था उघडे पर्यत तर 200 लोकांची बुकिंग झालेली असते अशा अनेक प्रश्नाना नागरिकाना कोणतीच उत्तरे मिळत नसल्याने नागरिकां मध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. देशात अभिव्यक्ती भाजपाचे व राज्यात महा आघाडीचे सरकार असल्याने लोकप्रतिनिधी असो वा स्थानिक नेते यांनी ही अळीमिळी गुपचिळी ची भूमिका घेतल्याने सर्व सामन्य नागरिक सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करत असले तरी तो आवाज प्रशासना पर्यत राजकीय नेत्या पर्यत पोहचत नसल्याने सर्व आलबेल असल्याचे चित्र पहावयास मिळत असताना अनेक नागरिक पत्रकारा ना जाब विचारायला मागे पुढे पाहत नाहीत व आमचे नाव वापरू नका पण तुम्ही आवाज उठवा अशी अपेक्षा करत आहेत यावर शक्य तेथे पत्रकार ही आपल्या स्तरावरून काम करताना पत्रकाराना फ्रंट वर्कर समजून त्वरित लसीकरण करा ही वरिष्ठ नेते काँग्रेसचे प्रमुख, व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलेली मागणी ही जर मान्य होऊ शकत नसेल व पत्रकारांना अद्याप लस मिळत नसेल तर तुमच्या आमच्या सारख्यानी कितीही
सोशल मीडियावर मागण्या केल्या तरी त्याचा काहीही उपयोग होणार आहे का?
त्यामुळे लोकांनी लई टेन्शन घेऊ नये. घरात रहा सुरक्षित रहा.

