कवडदरा विद्यालयात आनंद मेळावा उत्साहात
नाशिक- प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील भारत सर्व सेवा संघ शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॕलेज कवडदरा विद्यालयात *आनंद मेळावा* (दि.०३) शुक्रवार रोजी सकाळी आठ ते बारा या वेळेत मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.
यामध्ये इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतचे *होतकरु तसेच गुण संपन्न* विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.विद्यार्थ्यांनी स्वतः अनेक स्वादिष्ठ पदार्थ बनवून स्टाॕल तयार करुन विक्रीसाठी मांडले होते.यामध्ये वडा पाव,पाव भाजी,भजे,पोहे,मिसळ पाव,गुलाबजाम,बर्फी,पुरी भाजी,भेळ,शेव चिवडा,पुलाव व्हेज,दाबेली,आईसक्रिम,लिंबू सरबत,ज्यूस,चाॕकलेट,गोळ्या तसेच इतर पदार्थ विद्यार्थ्यांनी स्वतः बनवले होते.
वेगवेगळ्या प्रकारची बुद्धीला चालना देणारे खेळ प्रकार यावेळी स्टाॕलवर होते.गृह उपयोगी वस्तू तसेच सौदंर्य प्रसादने तसेच दररोज लागणाऱ्या वस्तूचे स्टाॕल होते.यावेळी गावातील तसेच परिसरातील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे पालक तसेच माजी विद्यार्थी,शाळेतील शिक्षक व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विविध खाऊ पदार्थ तसेच वस्तू व पालेभाज्या विद्यार्थ्यांकडून खरेदी केल्या.यावेळी प्राचार्य व्हि.एम.कांबळे सर तसेच विद्यार्थी स्वयसेवक विद्यार्थी तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांचे विशेष सहकार्य या आनंद मेळाव्याला मिळाले. यांनी आनंद मेळाव्यासाठी परीसरातील मान्यवर ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.