अहिल्यानगर जिल्ह्यातील ९ साखर कारखान्यांच्या दराची ऊस!
By Admin
अहिल्यानगर जिल्ह्यातील ९ साखर कारखान्यांच्या दराची ऊस उत्पादकांना अद्यापि प्रतीक्षाच!
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
जिल्ह्यातील सहकारी व खासगी अशा एकूण २२ पैकी ९ साखर कारखान्यांकडून गाळप हंगाम सुरू होऊन महिना झाला तरी अद्याप उसदर जाहीर करण्यात आलेला नाही. दोन सहकारी व एक खासगी असे ३ कारखाने सुरू झाले नाहीत.
उर्वरित १० पैकी पद्श्री विखे पाटील व गंगामाई यांनी २९५० रु. तर ८ कारखान्यांनी ३ हजार रु. पहिली उचल देण्याचे जाहीर केले आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही कारखान्यांकडून ऊस दर जाहीर करण्यास विलंब होत असल्याची चर्चा आहे.
कुकडी व केदारेश्वर हे दोन सहकारी व साईकृपा देवदैठण हा खासगी कारखाना सुरू झालेला नाही. उर्वरित १९ कारखान्यांचा हंगाम सुरू झाला. त्यापैकी १० कारखान्यांनी पहिली उचल जाहीर केली. मात्र ९ कारखान्यांकडून अद्यापि ऊसदर जाहीर नाही. या कारखान्यांकडून आत्तापर्यंत ५९ हजारापेक्षा जास्त मे. टन ऊसाचे तर सूरू एकूण कारखान्यांकडून ३१ लाख १४ हजार १४६ मे. टन गाळप व २२ लाख ६१ हजार ३१८ क्विंटल साखर पोती उत्पादन झाले.
उसाचे गाळप व साखर उत्पादनाची कारखानानिहाय आकडेवारी अशी- कोल्हे कारखानाः ९६ हजार ९७७ मे. टन गाळप व ६३ हजार २५० क्विंटल साखर, पद्श्री विखे पाटील २ लाख १३ हजार मे. टन गाळप व १ लाख ३१ हजार क्विंटल साखर. बारामती अॅग्रो ९६ हजार ३७२ मे. टन गाळप, ८३ हजार १७० क्विंटल साखर, इंडीकॉन अंबानीका ४ लाख ९५ हजार मे. टन गाळप, ३ लाख १५ हजार क्विंटल साखर, स्वामी समर्थ ७२ हजार २६२ मे. टन गाळप, ५२ हजार २८ क्विंटल साखर, सोपानराव ढसाळ ४० हजार २६० मे. टन गाळप, १९ हजार ४०५ क्विंटल साखर, अगस्ती ६० हजार ४७८ मे. टन गाळप, ४५ हजार १८० क्विंटल साखर. कर्मवीर काळे १ लाख ६५ हजार ६०२ मे. टन गाळप, १ लाख ४९ हजार ७५० क्विंटल साखर, अशोक १ लाख ८ हजार ७३० मे. टन गाळप, ८४ हजार ५५० क्विंटल साखर, क्रांती शुगर ७५ हजार २८५ मे. टन गाळप, ७१ हजार ३७५ क्विंटल साखर, वृद्धेश्वर ८८ हजार ४१५ मे. टन गाळप ६७ हजार १५० क्विंटल साखर, नागवडे २ लाख १७ हजार ६८० मे. टन गाळप २ लाख ९०० क्विंटल साखर. थोरात २ लाख ३ हजार ६० मे. टन गाळप १ लाख ६४ हजार ६६० क्विंटल साखर. गणेश ३१ हजार ७५० मे. टन गाळप १५ हजार ९२५ क्विंटल साखर उत्पादन.
गौरी शुगर २ लाख ६ हजार मे. टन गाळप १ लाख ४३ हजार ३७५ क्विंटल साखर. घुले २ लाख ७९ हजार मे. टन गाळप २ लाख १९ हजार ९०० क्विंटल साखर, गंगामाई २ लाख ६० हजार १३० मे. टन गाळप १ लाख १७ हजार ७५० क्विंटल साखर, प्रसाद शुगर १ लाख ४४ हजार मे. टन गाळप १ लाख ३७ हजार २०० क्विंटल साखर, मुळा २ लाख ५७ हजार २१० मे. टन गाळप १ लाख ७८ हजार ९०० क्विंटल साखर उत्पादन.
ऊस दर जाहीर न केलेले कारखाने
कोल्हे, बारामती अॅग्रो, इंडोकॉन एबालिका, स्वामी समर्थ शुगर, सोपानराव ढसाळ, नागवडे, गणेश, गौरी शुगर, साईकृपा.
दर जाहीर केलेले कारखाना
पद्श्री विखे पाटील (२९५६), गंगामाई (२९५०), अगस्ती, कर्मवीर काळे, अशोक, वृद्धेश्वर, सहकारमहर्षी थोरात, लोकनेते घुले, प्रसाद शुगर, मुळा प्रत्येकी ३ हजार रु. पहिली उचल जाहीर केली.
35382
10




