महाराष्ट्र
एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांची फसवणूक; आरोपी मोकाट
By Admin
एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांची फसवणूक; आरोपी मोकाट
घारगावात गुन्हा : गुजरातसह, अहिल्यानगर, पुणे, धुळे येथील विद्यार्थी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
रशियात एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची २५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी सप्टेंबर महिन्यात संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. फसवणूक करणाऱ्या कुणाल पोटळे (रा. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. मात्र, पसार असून घारगाव पोलिस त्याच्यापर्यंत पोहचू शकलेले नाहीत.
पोटळे याने घारगाव येथील रहिवासी असलेल्या आणि रशियात एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासह गुजरात तसेच अहमदनगर, पुणे, धुळे या जिल्ह्यांतील मूळचे रहिवासी असलेल्या आणि रशियात एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या एकूण ९ विद्यार्थ्यांची २५ लाख ५७ हजार रुपयांची फसवणूक केली. त्याच्याविरुद्ध प्राध्यापक असलेल्या अशोक भिकाजी शिरोळे (वय ५७, रा. नांदूर खंदरमाळ, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून
काय आहे प्रकरण
२०२२ मध्ये रशियात आणि युक्रेन या दोन देशात युद्ध सुरू झाले. त्यामुळे अमेरिकेने रशियातील सर्व मास्टर कार्ड आणि व्हिसा कार्ड बंद केले होते. त्यामुळे ऋषी शिरोळे याच्या बँक खात्यावर रुपये असताना सुद्धा त्याला ते काढता येत नव्हते. तो शिक्षण घेत असलेल्या रशिया येथील महाविद्यालयातील पुढच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या गुजरात येथील उत्सव पटेल या मित्राने पुणे येथील कुणाल पोटळे याचा मोबाइल क्रमांक दिला. त्याच्याशी ऋषी शिरोळे याने संपर्क साधत पैशाचे रूपांतर करण्याबाबत बोलणे झाले. 'माझे कमिशन घेऊन पैसे पाठवून देतो. असे पोटळे म्हणाला. त्याने शिरोळे याला त्याच्या बँक खात्याचा क्रमांक दिला. १ नोव्हेंबर २०२३ शिरोळे याने त्या खात्यावर २५ आणि ७५ हजार रुपये पाठविले.
पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला. प्रा. शिरोळे हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथील कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवेत आहे. त्यांचा मुलगा ऋषी
दिल्ली येथील एका मुलाचीही फसवणूक
एका अॅपच्या माध्यमातून पोटळे याने शिरोळे याला डॉलर स्वरूपात रुपये पाठवले. ते रुपये शिरोळे याने त्याच्या रशिया येथील बँक खात्यात रुबल (रशियाचे चलन) मध्ये जमा करून शिक्षणासाठी वापरले. त्यानंतर पोटळे याच्यावर विश्वास बसल्याने शिरोळे आणि त्यांच्या इतरही ९ मित्रांनी पोटले याच्या खात्यावर रुपये पाठविले. त्या सर्वांनी मिळून ३९ लाख १३ हजार १०० रुपये पाठविले, ज्याचे त्याचे पैसे पोटळे याने त्यांना पाठवले. त्यामुळे त्याच्यावर सर्वाचाच विश्वास बसला होता. मात्र, त्यानंतर त्या सर्वांनी मिळून पाठविलेले एकूण २५ लाख ५७ हजार रुपये पोटळे याने परत पाठविले नाही. त्याला वेळोवेळी फोन करून त्याचा मोबाइल क्रमांक बंद यायचा. संपर्क झाल्यास तो रुपये देण्यास टाळाटाळ करायचा. दिल्ली येथील एका मुलाचीही पोटळे याने अशीच फसवणूक केली. आपल्या मुलासह त्याच्या मित्रांची देखील फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रा. शिरोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला.
या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल असलेल्या कुणाल पोटळे याचा पोलिस शोध घेत आहेत. तो मोबाइल बदलतो. पूर्वीचे मोबाइल त्याने बदलून टाकले. तो गुजरातला असल्याचे समजले होते. त्याने फोन नंबर बदलला. तपास सुरू आहे.
- दिगंबर भदाणे, पोलिस निरीक्षक घारगाव पोलिस ठाणे, ता. संगमनेर
शिरोळे हा २०१८ पासून रशिया येथे एमबीबीएसचे शिक्षण घेतो, त्याचे अंतिम वर्षाचे शिक्षण बाकी आहे. त्याचे शिक्षणासाठी अशोक शिरोळे हे एका बँकेच्या नारायणगाव येथील शाखेतून
मुलाच्या बँक खात्यावर रुपये पाठवायचे. त्यानंतर मुलगा रशियामध्ये एटीएमद्वारे रुपये काढायचा. २०१८ ते २०२२ पर्यंत अशोक शिरोळे नियमित रुपये पाठवायचे.
Tags :
16881
10