महाराष्ट्र
दीड लाखांचे मोबाईल जप्त; पोलिसांची कारवाई
By Admin
दीड लाखांचे मोबाईल जप्त; पोलिसांची कारवाई
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
जबरी चोरी करून मोबाईल
फोन लुटणाऱ्या सराईत आरोपींकडून १ लाख ५५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. येथील शहर पोलिसांनी नुकतीच ही कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १४ ऑगस्ट रोजी बबन पोपट पठारे (रा. सहयाद्री इंजिनिअरिंग, एम.आय.डी.सी. खंडाळा) हे सांयकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कंपनीतील कामावरुन सुट्टी झाल्यानंतर किराणा आणण्याकरीता कंपनीतून निघून वाकडी ते दत्तनगर रोडने दत्तनगरकडे मोटारसायकलवर जात होते. यादरम्यान तीन अनोळखी चोरट्यांनी मोटारसायकल आडवून लाथा बुक्क्यांनी व कमरेच्या बेल्टने मारहाण करुन त्यांच्या खिशातील पैसे व मोबाईल बळजबरीने काढून घेतले होते. याप्रकरणी तीन अनोळखी चोरट्यांविरुद्ध येथील शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक नितीन
देशमुख यांनी तपास करून आरोपींना तात्काळ अटक करण्याचे तपास पथकास आदेश दिले. तपास पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी करून तसेच तांत्रिक विश्लेषन करून गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली. हा गुन्हा सराईत आरोपी मयुर विजय काळे (रा. सुतगिरणी, रेणुकानगर, दत्तनगर) व त्याचे साथीदार रोहिदास सोपान रामटेके (रा. रांजणखोल ग्रामपंचायतसमोर), दत्तु ऊर्फ हेमंत किशोर शेळके (रा. महाराष्ट्र वाईनशॉपच्या मागे श्रीरामपूर) यांनी मिळून केल्याची माहिती मिळाली. याआरोपींचा शोध घेताना दि. १७ ऑगस्ट रोजी
Ahmednagar Edition Edition
Sep 04, 2024 Page No. 01
Powered by: erelego.com
माहिती मिळाली की, आरोपी त्यांच्या राहत्या घरी आले असून ते पळुन जाण्याच्या तयारीत आहेत. या खबरीवरून तपास पथकाने तीन टिम बनवून तात्काळ तिन्ही आरोपीच्या राहत्या घरी रवाना केल्या. त्यांचा शोध घेत मयुर विजय काळे, रोहिदास सोपान रामटेके हे त्यांच्या राहत्या घरी मिळून आले. त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी हा गुन्हा साथीदार शेळके याच्यासह मिळुन केल्याची कबुली दिली. आरोपींकडून गुन्ह्यातील तसेच एम.आय.डी.सी. खंडाळा परिसरातून वेळोवेळी बळजबरीने हिसकावून नेलेले मोबाईल व रोख रक्कम तसेच गुन्हा करताना वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या तपास पथकाने केली असून गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक दीपक मेढे करीत आहेत.
Tags :
70207
10