मद्यपी वाहनचालकांवर पाथर्डी पोलिसांची कारवाई
पाथर्डीत ३१ डिसेंबरच्या रात्री वाहनांची तपासणी करताना पोलीस अधिकारी व कर्मचारी
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला शहर व तालुक्यातील बेकायदेशीर व दारू पिऊन
वाहन चालवणाऱ्या सुमारे ५४ वाहनधारकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री
आठ ते बारा या दरम्यान ही कारवाई केली आहे.
बेकायदेशीर दारू विक्री
करणाऱ्या दहा जनावर, ट्रिपल सीट, नंबर प्लेट, शीट बेल्ट न लावणे आदी नियम मोडणाऱ्या ४२ वाहनधारकांवर तर दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या १२ वाहनधारकावर कारवाई करण्यात आली. एका दिवसात सुमारे ६५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. तालुक्यामध्ये पाथर्डी पोलिसांनी ३१ डिसेंबर रोजी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. ३१ डिसेंबरच्या रात्री यामध्ये शहरातील आंबेडकर चौक, नाईक चौक, नागेबाबा बँक समोर व संस्कार भवन तर तालुक्यातील तिसगाव, करंजी, मिरी, खरवंडी, भालगाव, कोरडगाव, टाकळी मानूर आदी
मोठ्या गावामध्ये नाकाबंदी करण्यात आली होती. राज्य व राष्ट्रीय महामार्गावर फिरत्या पथकाच्या माध्यमातून रात्री आठ ते दोन वाजेपर्यंत तपासणी मोहीम राबवण्यात आली. या तपासणी मोहिमेत स्वतः पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी तांबे, हरीश भोये, पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, विलास जाधव, वाहतूक विभागाचे अल्ताफ शेख, विनोद कुसळकर, अमोल आव्हाड, संजय जाधव, राम सोनवणे, इजाज सय्यद यांसह ४० पोलीस कर्मचारी व २२ होमगार्ड सहभागी झाले होते. दारुड्या विरुद्ध कारवाई केल्याने पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे.