महाराष्ट्र
शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघातील प्रमुख अपक्षांतील रस्सीखेच ठरणार निर्णायकप्रमुख पक्षांच्या तंबुत अस्वस्थता
By Admin
शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघातील प्रमुख अपक्षांतील रस्सीखेच ठरणार निर्णायकप्रमुख पक्षांच्या तंबुत अस्वस्थता
पाथर्डी-शेवगाव - प्रतिनिधी
या बाबत सविस्तर वृत्त असे की शेवगांव च्या माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांचा खटका
पाथर्डीच्या आमदार राजळेंचं स्लो बट स्टेडी, ढाकणेंचा सातत्याचा जनसंपर्क काकडेंची आंदोलने आणि भाकरी फिरली तर वंचित च्या चव्हाणांची तोफही धडाडू लागली. अजून चार दिवसांत पुलाखालून बरंच पाणी वाहणार असलं तरी एकंदरीत शेवगाव- पाथर्डी विधानसभा मतदारसंघात चुरस निर्माण झाली आहे. या कसोटीच्या दिवसांत कोण कसा निवडणुकीला सामोरा जातो, यावर या मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट होईल.
शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघ पुरोगामी विचारसणीला साथ देत आला असला तरी गेल्या दहा वर्षांत भाजपाने या मतदारसंघावरची पकड मजबूत केली आहे. २०१९ च्या तिरंगी लढतीत ती काहिशी सैल झाली असली तरी पुरेशी सुटलेलीही नाही. २० नोव्हेंबर २०२४ ला होऊ घातलेल्या बहुरंगी लढतीत मात्र धक्कादायक निकाल लागण्याचे संकेत मिळत आहेत. २००८ ला झालेल्या मतदासंघांच्या फेररचनेनुसार शेवगाव- पाथर्डी हा मतदारसंघ अस्तित्वात आला होता. त्यानुसार झालेल्या २००९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत चंद्रशेखर घुले पाटील यांनी भाजपाचे तत्कालिन उमेदवार प्रताप ढाकणे व प्रमुख अपक्ष उमेदवार स्व. राजीव राजळे यांचा पराभव करत विजय मिळवला होता. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत मात्र आमदार मोनिका राजळे यांनी एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालिन उमेदवार चंद्रशेखर घुले पाटील यांना पराभूत करून विजय नोंदवला होता. २०१९ ला आमदार मोनिका राजळे यांनी एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालिन उमेदवार प्रताप ढाकणे यांचा १४००० मतांनी निसटता पराभव केला असला तरी त्यांच्या मताधिक्यात सुमारे ३०००० मतांची घट झाली होती. याच निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार किसन चव्हाण यांनी नऊ हजारांवर मते मिळवली होती. २०१९ ला आमदार राजळे यांचं घटलेलं मताधिक्य पाहता, यंदाच्या निवडणुकीत त्याचीच पुनरावृत्ती होऊन त्यात अजून घट होण्याचे संकेत मिळत असतानाच ही निवडणूक बहुरंगी होत असल्यामुळे गुंता वाढला आहे. यावेळी चंद्रशेखर घुले पाटील व हर्षदा काकडे, या दोन प्रमुख अपक्षांसह वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. किसन चव्हाण हे कुणाच्या मतांवर किती प्रमाणात डल्ला मारतात यावर बरंच काही अवलंबून असेल. महायुती व महाविकास आघाडीच्या कोअर व्होटरसह दोन्ही उमेदवारांची जशी हक्काची व्होट बँक आहे
त्याप्रमाणेच माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील व हर्षदा काकडे यांचीही सहकारी व शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून हक्काची व्होट बँक आहे. वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या हक्काच्या मतांसह, या पक्षाचे उमेदवार प्रा. किसनराव चव्हाण यांना मानणाऱ्या मतदारांची संख्या लक्षणीय व निर्णायक असल्यामुळे, त्यांनाही अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालं आहे. एकंदरीत येत्या चार दिवसांत साम-दाम- दंड-भेद या कुटनीतीनुसार, प्रमुख अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले पाटील काय करामत करतात व हर्षदा काकडे किती मतं मिळवितात यावर आमदार मोनिका राजळे व प्रताप ढाकणे यांच्या जय पराजयाचे गणित अवलंबून असेल. आजमितीला, शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील लढतीच्या शेवटच्या टप्प्यात मोठी चुरस निर्माण झाली असली तरी ही निवडणूक प्रामुख्याने चंद्रशेखर घुले पाटील आमदार मोनिका राजळे व प्रतापराव ढाकणे यांच्याभोवती फिरत आहे असे दिसते. शरद पवार यांनी, महाविकास आघाडीचे
उमेदवार प्रतापराव ढाकणे यांच्या प्रचारार्थ शेवगाव येथे घेतलेल्या सभेला खासदार निलेश लंके यांच्या लंके प्रतिष्ठान चे अनेक मोहरे गायब झाल्याने प्रताप ढाकणेंचि गोची झाली आहे लोक बदलाच्या मानसिकतेत असल्याचे दिसून येते. महायुतीच्या उमेदवार आमदार मोनिका राजळे यांच्यासाठी, माजी खासदार प्रीतम मुंडे यांची सभा संपन्न झाली असली शनिवाच्या आमदार पंकजा मुंडे यांच्या सभेवरच विद्यमान आमदारांचा प्रचाराचा भार अवलंबून आहे असे दिसते चंदशेखर घुले पाटील यांचा प्रचाराचा धुराळा. घुले कुटुंबाने प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीगाठी यावर भर दिल्याने विरोधकांची दमछाक करणार आहे आहे या शर्यतीचा निकाल राज्यात चर्चा होणारा वेगळा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले पाटील यांची उमेदवारी विरोधकांच्या तंबुत अशांतता पसरवणारी आहे तरुण वर्गाचा मिळणार उस्फुर्त प्रतिसाद आणि अनेक समाजांचा घातलेला मेळ नेमका कोणाचा बुरुज ढासळवणार हे येणार काळच ठरवेल ?
Tags :
135672
10